Join us  

हे काय नवलंच!; IPLबनला निवडणुकीचा मुद्दा; महापौर म्हणतात जिंकून आल्यावर शहरात आयपीएलचे आयोजन

आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० लीग आहे यात वादच नाही, म्हणूनच आता लंडनध्ये IPL ही निवडणुकीचा मुद्दा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 8:30 AM

Open in App

Indian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली. २०१२नंतर मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या पर्वातील पहिला सामना जिंकण्यात अपयश आलं. पाच विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलला ( Harshal Patel) सामनावीर म्हणून जाहीर करण्यात आलं. आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० लीग आहे यात वादच नाही, म्हणूनच आता लंडनध्ये IPL ही निवडणुकीचा मुद्दा झाली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत महापौरपदासाठी पुन्हा अर्ज दाखल केलेल्या सादिक खान यांनी शहरात IPL खेळवण्याचं वचन दिलं आहे. कोरोना कमी झाल्यानंतर इंग्लंडच्या राजधानीत आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करेन असे आश्वासन खान यांनी दिले आहे.  

नॅशनल फुटबॉल लीग व मेजर लीग बेसबॉल स्पर्धा लंडनमध्ये खेळवल्या जात आहेत. येथील टॉटन्हॅम हॉटस्पर येथील स्टेडियमवर १० वर्षांसाठी नॅशलन फुटबॉल लीग खेळवण्याचा करार झाला आहे. या लीगच्या यशस्वी आयोजनानंतर खान यांना लंडनमध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन खुणावत आहे. आयपीएलच्या आयोजनानं पर्यटनालाही चालना मिळेल, आणि रोजगार निर्मिती होईल, असे त्यांना वाटते.

ते म्हणाले, कोरोना संकटानंतर लंडनमध्ये अधिकाधिक सुधारणा करण्यावर माझा भर असेल. लंडनमधील लोकं विराट कोहली, रोहित शर्मा आणि रिषभ पंतचे फॅन्स आहेत. यांना येथील लॉर्ड्स व ओव्हल मैदानावर खेळताना पाहणे, त्यांना आवडेल. त्यामुळे आयपीएल आयोजनसाठी लंडन योग्य ठिकाण आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१लंडन