मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश व्ही. एम. गोखले यांनी प्रशासक या नात्याने मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांना एमसीएच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. तसेच, आयपीएलच्या विशेष पासमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी निवृत्त न्या़ कानडे गुरूवारी मागदर्शकतत्त्वे तयार करणार आहेत़ १४ व १७ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यांसाठी ही मार्गदर्शकतत्त्वे लागू होतील़ त्यामुळे या सामन्यांमध्ये विशेष पास नव्या नियमांनुसार दिले जातील़
लोढा समितीच्या शिफारशींचा अवलंब करण्यात वारंवार होत असलेल्या दिरंगाईबद्दल एमसीएला नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले होते. यामुळे ४ एप्रिलला उच्च न्यायालयाने गोखले आणि कानडे यांची एमसीएचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. बुधवारी नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांनी एमसीएच्या उच्च अधिकाºयांची भेटही घेतल्याचे माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशासकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शेलार यांची इच्छा जाणून घेतली. त्यावर शेलार यांनी एमसीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यापुढे निवडणुकीद्वारे नवीन कार्यकारणी समिती स्थापन होईपर्यंत प्रशासकच सर्व कारभार पाहतील़
आयपीएलदरम्यान होणाºया विशेष पासेसमध्ये होणारा गैरव्यवहार रोखण्याच्या दिशेने प्रशासकांनी कठोर पावले उचलली असून गुरूवारी त्यासाठी मार्गदशर्कतत्त्वे तयार केली जाणार आहेत़ यात तिकिटांची होणारी एकूण विक्री, एमसीएशी संलग्न क्लबना मिळणारा कोटा तसेच योग्य व्यक्तीपर्यंत तिकिटे पोहचतात की नाही यावर मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात येतील.
Web Title: 'MCA' after Shelar; Controlled formulas
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.