MCA Elections: भारताच्या महान फलंदाजांपैकी असलेल्या सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. या दिग्गज क्रिकेटपटूंना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत मतदान करू दिले जाणार नाही. या यादीत सचिन, गावसकर यांच्याशिवाय अजित आगरकर, संजय मांजरेकर, वसीम जाफर, विनोद कांबळी, ए साळवी आणि पारस म्हांबरे यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
18 रोजी निवडणूक होणार आहे
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पुढील अध्यक्षाची निवड करण्यासाठी 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना मतदान करू दिले जाणार नाही. याचे कारण म्हणजे माजी क्रिकेटपटूंनी निवडणुकीपूर्वी त्यांचे मतदार ओळखपत्र सादर केलेले नाही, तसेच नोंदणीची माहितीही दिलेली नाही. यातील अनेक दिग्गज देशाबाहेरही आहेत. ई-व्होटिंगसाठीही विनंती करण्यात आली होती, पण ही विनंती फेटाळण्यात आली आहे.
ई-मतदान विनंती नाकारलीसंदीप पाटील हे एमसीए अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संदीप पाटील यांनी एमसीए निवडणुकीसाठी ई-व्होटिंगला परवानगी देण्याची विनंती केली होती, पण ती फेटाळण्यात आली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकासाठी गावस्कर, मांजरेकर आणि आगरकर यांचा समालोचन पॅनेलमध्ये समावेश होण्याची अपेक्षा आहे. तर, म्हांबरे हे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत तर साळवी आणि जाफर हे इतर संघांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.
अनेक पदांसाठी निवडणूक होणार आहेअध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांची एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष अमोल काळे यांच्याशी लढत आहे. गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांसोबतच, MCA मानद सचिव, खजिनदार आणि सर्वोच्च पदांसाठीही निवडणूक होणार आहे. मुंबईचे निवृत्त पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची सहसचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.