लंडन : काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या एका गोलंदाजाने बॉल टॅम्परिंग केल्याचे पाहायला मिळाले होते. आता तर इंग्लंडच्याच एका माजी क्रिकेटपटूने बॉल टॅम्परिंगबाबत खळबळनजक वक्तव्य केले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदेज जेम्स अँडरसनसाठी मी बॉल टॅम्परिंग करायचो, असे एका माजी खेळाडूने म्हटले आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडल्याची चर्चा होती. इंग्लंडचा गोलंदाज लायम प्लंकेटने चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) प्लंकेटनं असं काहीच चुकीचं केलं नसून त्याला क्लिन चीट दिली. इंग्लंडच्या जोस बटलरने 55 चेंडूंत 9 षटकार व 6 चौकार खेचून नाबाद 110 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर 374 धावांचे आव्हान उभं केलं. पाकिस्तानकडूनही त्यांना कडवे उत्तर मिळाले, परंतु त्यांना अवघ्या 12 धावांनी हा सामना गमवावा लागला. पण, या सामन्यात 'बॉल टॅम्परिंग'चा प्रकार घडल्याचे समोर आले होते.
आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास केला. पण, त्यांनी प्लंकेटला क्लिन चीट दिली.'सामनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉल टॅम्परिंगसारखा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसे पुरावेही नाहीत,'' अशी प्रतिक्रीया आयसीसीनं दिली.
इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पनेसारने हा धक्कादायक खुलासा केला आहे. पनेसारने ' द फुल माँटी' नावाचे एक पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकामध्ये पनेसारने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. बॉल टॅम्परिंग कसे केले जाते आणि त्याचा नेमका फायदा काय होतो, हेदेखील पनेसारने सांगितले आहे.
याबाबत पनेसार पुस्तकात म्हणाला आहे की, " अँडरसन हा चांगला गोलंदाज आहे. त्याचे रीव्हर्स स्विंगही चांगले व्हायचे. पण ते रीव्हर्स स्विंग करण्यासाठी तो मला बॉल टॅम्परिंग करायला सांगायचा. मी बॉल टॅम्परिंग केल्यावर तो रीव्हर्स स्विंग करायचा."
प्लंकेटने ज्या सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याचे म्हटले गेले, त्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी यावेळी दमदार सुरुवात केली आणि संघाला शतकी सलामी करून दिली. बटलर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडची 35.1 षटकांत 3 बाद 211 अशी स्थिती होती. बटलरने खेळपट्टीवर आल्यापासूनच गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बटलरला यावेळी कर्णधार इऑन मॉर्गनची चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची अभेद्य भागीदारी रचली. मॉर्गनने 48 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 71 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या फाखर जमान ( 138), बाबर आझम ( 51), आसीफ अली ( 51), सर्फराज अहमन ( 41*) आणि इमान उल-हक ( 35) यांनी तुफानी खेळी केली. पण, 12 धावांनी त्यांचा विजय हुकला. या सामन्याच्या अखेरच्या षटकात चेंडू कुरतडण्याचा प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी नुकतीच बंदीची कारवाई पूर्ण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. चेंडू कुरतडण्याचा हा प्रसंग ताजा असताना इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेट याने चेंडू कुरतडण्याचा प्रताप केला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा प्रताप व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सकडून प्लंकेटवर कारवाई करण्याची मागणी झाली होती.
Web Title: me tampering the ball for James Anderson, England's embarrassing statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.