Join us  

Medical Update: जसप्रीत बुमराह अन् श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीबाबत जय शाह यांनी दिली मोठी माहिती

Medical Update: Jasprit Bumrah and Shreyas Iyer : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांच्याबद्दल बीसीसीआयने मोटी अपडेट्स दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 4:00 PM

Open in App

Medical Update: Jasprit Bumrah and Shreyas Iyer : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांच्याबद्दल बीसीसीआयने मोटी अपडेट्स दिले आहेत. जलदगती गोलंदाज जसप्रीत जो IPL 2023 मधून बाहेर झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयसही आयपीएल खेळत नाहीए. न्यूझीलंडमधून शस्त्रक्रिया केल्यानंतर बुमराह लवकरच तंदुरूस्तीवर काम कणार आहे आणि श्रेयसवर पुढील आठवड्यात शस्त्रक्रीया होणार आहे.

जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबद्दलची पहिली तक्रार गेल्या वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या आशिया चषकापूर्वी आली होती. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत त्याला स्थान मिळाले नाही. यानंतर बुमराहला ऑस्ट्रेलियात झालेल्या ICC T20 वर्ल्ड कप २०२२ मधूनही वगळण्यात आले. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी तो संघात परतला होता. मात्र पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा त्याला माघार घ्यावी लागली. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला होता मात्र तो तंदुरुस्त होऊ शकला नाही. त्यानंतर तो शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूझीलंडला गेला होता. 

अय्यरबद्दल सांगायचे तर अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात त्याला पाठदुखीचा त्रास झाला. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतर तो पुनर्वसनही करणार आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनासाठी अजून बराच अवधी आहे आणि ऑक्टोबर महिन्यात भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप २०२३आधी या दोघांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बुमराह आणि श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल अपडेट देताना, बीसीसीआयने सांगितले की न्यूझीलंडमध्ये पाठीच्या खालच्या भागावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर बुमराह ६ आठवड्यांचा पुनर्वसन सुरू करेल. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन होईल. श्रेयस जो आयपीएल 2023 च्या हंगामातून बाहेर आहे, त्याच्या पाठीवर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. सुमारे दोन आठवडे तो डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असेल. त्यानंतर NCA मध्ये पुनर्वसनासाठी परत येईल.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :जसप्रित बुमराहश्रेयस अय्यरबीसीसीआय
Open in App