ठळक मुद्देफ्रँचायझी ज्या खेळाडूंना संघात कायम राखतील त्या खेळाडूंच्या पगाराएवढी रक्कम फ्रँचायझीच्या सॅलरी पर्समधून वजा करण्यात येईल.
Mega auction for IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) १४व्या पर्वाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्यात येणार आहे. त्याचवेळी आता BCCI ने आयपीएल २०२२साठीच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयनं IPL 2022 Mega Auctionची ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यात त्यांनी आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, खेळाडूंचे रिटेंशन, मेगा ऑक्शन, फ्रँचायझीच्या सॅलरी पर्समध्ये वाढ आणि मीडिया राईट्स याबाबत बीसीसीआयनं काही निर्णय घेतले आहेत. ( BCCI prepares blueprint for new IPL franchises, player retention and a mega auction)
पुढील पर्वात दोन नवीन फ्रँचायझी दिसणार हे निश्चित आहे आणि त्यासाठी मेगा ऑक्शन घेण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतराला याबाबतची घोषणा करण्यात येईल आणि ऑक्टोबर मध्यंतरापर्यंत नव्या फ्रँचायझींसाठी बोली लावता येणार आहे. कोलकाता येथी आरपी संजीव गोएंका ग्रुप आणि अहमदाबादचे अदानी ग्रूप या दोन फ्रँचायझी अनुक्रमे हैदराबाद व गुजरात संघासाठी उत्सुक आहेत.
बीसीसीआयनं या मेगा ऑक्शनसाठी सॅलरी पर्स ८५ कोटीहून ९० कोटीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे एकूण १० फ्रँचायझींसाठी बीसीसीआयनं पर्समध्ये ५० कोटींची वाढ केली आहे. यापैकी ७५ टक्के रक्कम ही ऑक्शनमध्ये खर्च करणे फ्रँचायझीला भाग आहे. पुढील तीन वर्षांत सॅलरी पर्समधील रक्कम १०० कोटीपर्यंत वाढवण्यात येईल. मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम राखता येईल. या चारपैकी तीन खेळाडू भारतीय असतील व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असे असू शकतील. ( IPL franchises are allowed to retain 4 players, either it can be 3 Indians and 1 overseas or 2 Indians and 2 overseas for IPL 2022 ahead of the mega auction)
फ्रँचायझी ज्या खेळाडूंना संघात कायम राखतील त्या खेळाडूंच्या पगाराएवढी रक्कम फ्रँचायझीच्या सॅलरी पर्समधून वजा करण्यात येईल. बीसीसीआयच्या प्लेअर रिटेशन नियमानुसार प्रत्येक संघाला चार प्रमुख खेळाडूंनाच कायम राखता येईल. त्यानुसार जर फक्त मुंबई इंडियन्सचाच विचार केल्यास रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड व क्विंटन डी कॉक किंवा रोहित, जसप्रीत, हार्दिक पांड्या व किरॉन असे चार खेळाडूच रिटेन केले जाऊ शकतात.
Web Title: Mega auction for IPL 2022 : franchises are allowed to retain 4 players, either it can be 3 Indians and 1 overseas or 2 Indians and 2 overseas
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.