KL Rahul And Athiya Shetty : भारतीय संघाचा स्टार खेळाडू लोकेश राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी अनाथ मुलांसाठी पुढाकार घेत एका फाउंडेशनच्या मदतीने त्यांना मदतीचा हात म्हणून कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या जोडप्याने विपला फाउंडेशनच्या माध्यमातून रक्कम गोळा करण्यासाठी बड्या क्रिकेटपटूंची मदत घेतली. या उपक्रमाचे नाव 'क्रिकेट फॉर ए कॉज' असे ठेवण्यात आले आहे. यामाध्यमातून राहुल आणि अथियाने एका खास लिलावाचे आयोजन केले आहे. अनेक नामांकित खेळाडू या अनोख्या लिलावात त्यांच्या आवडीच्या वस्तू दान करतील.
अथिया आणि राहुलने या उपक्रमासाठी राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, आर अश्विन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, रोहित शर्मा, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, आणि लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू जोस बटलर, क्विंटन डीकॉक, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन या नावांची माहिती दिली आहे. २३ ऑगस्ट रोजी लिलाव प्रक्रिया पार पडेल.
विराट कोहलीची जर्सी आणि ग्लोव्ह्ज लिलावात असणार आहे. यामाध्यमातून अथिया शेट्टी आणि लोकेश राहुल अनाथ मुलांची मदत करू इच्छित आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांचीही बॅट आणि ग्लोव्ह्ज लिलावात असेल. गरिबांसाठी पुढाकार घेत असलेला राहुल त्याची बॅट, हेल्मेट आणि जर्सी लिलावात घेऊन येईल, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे.
अथिया-राहुलला दिग्गजांचे सहकार्य
धोनीची स्वाक्षरी असलेली बॅट (आयपीएल २०२४) लिलावात असेल.
विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली टीम इंडियाची जर्सी (आयसीसी विश्वचषक २०१९) आणि स्वाक्षरी केलेली बॅट आणि ग्लोव्ह्ज (आयसीसी विश्वचषक २०१९)
रोहित शर्माची स्वाक्षरी असलेली २०२३ च्या वन डे विश्वचषकातील बॅट.
लोकेश राहुलची स्वाक्षरी असलेली विश्वचषक २०२३ मधील बॅट.
Web Title: memorabilia donated by legendary players like ms dhoni, virat kohli and rohit sharma for KL rahul and Athiya shetty auction for children, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.