एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याला जवळपास एक वर्ष झाले आहे. मात्र अंतिम सामन्यातील पराभवाचे दु:ख अद्यापही कमी झालेले दिसत नाही. आता भारताचा सलामीवीर शिखर धवनने X वर एक पोस्ट केली आहे. यात “पुरुष कोणत्याही गोष्टीतून सावरू शकतात, पण 19 नोव्हेंबरच्या वेदना विसरणे शक्य नाही", असे शिखरने लिहिले आहे. तत्पूर्वी, रोहित शर्मानेही म्हटले होते की, ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचे दुःख अजूनही कायम आहे.
शिखर धवनने एक्सवर केलेल्या पोस्टसोबत एक बिलबोर्ड देखील शेअर केला आहे. यावर, ‘वैशाली, आय अॅम ओव्हर यू। नॉट युअर्स, खन्ना।’ या बिलबोर्डाच्या माध्यमाने कुण्या खन्नाने वैशालीला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. यामाध्यमाने त्याने, आता तो वैशालीला विसला आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
काय घडलं होते 19 नोव्हेंबरला -गेल्या 19 नोव्हेंबर 2023 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला होता. भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीतही चांगली सुरुवात केली होती. मात्र मोठ्या भागीदारीअभावी भारताला 50 षटकात केवळ 240 धावाच करता आल्या. यानंतर, ट्रॅव्हिस हेडच्या 120 चेंडूत 137 धावा आणि मार्नस लॅबुशेनच्या 110 चेंडूत नाबाद 58 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 43 षटकांतच विजय मिळवला आणि सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.