Breaking : टीम इंडिया खेळणार ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने; ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार बदल  

Men’s Future Tour Program for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 02:18 PM2022-08-17T14:18:10+5:302022-08-17T14:18:35+5:30

whatsapp join usJoin us
Men’s Future Tour Program for 2023-27 announced : India to battle against Australia for five-match Test series after 30 years, India will be playing 44 Tests, 63 ODI and 76 T20I from Aug 18, 2022 to February 2027 | Breaking : टीम इंडिया खेळणार ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने; ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार बदल  

Breaking : टीम इंडिया खेळणार ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने; ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार बदल  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Men’s Future Tour Program for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले. १२ सदस्यांच्या या वेळापत्रकात एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यात १७३ कसोटी, २८१ वन डे व ३२३ ट्वेंटी-२० सामन्यांचा समावेश आहे. आताच्या FTP मध्ये ६९४ सामने खेळवण्यात आले आहेत. आयसीसीने आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पुढील दोन पर्वातील वेळापत्रकही जाहीर केले आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९९२ नंतर प्रथमच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. २०२३-२५ ला ऑस्टेलियात बॉर्डक-गावस्कर ट्रॉफीसाठी चुरस रंगणार आहे, तर २०२५-२७मध्ये भारतात ही मालिका खेळवण्यात येणार आहे.  भारतीय संघ १८ ऑगस्ट २०२२ ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत ४४ कसोटी, ६३ वन डे व ७६ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. 

WTC मध्ये अॅशेस, भारत- इंग्लंड कसोटी मालिका याचीही उत्सुकता आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी ५ सामने खेळवले जातील. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारत हे अनुक्रमे २२, २१ व २० कसोटी सामने खेळणार आहेत.

याशिवाय भारतात होणारा वन डे वर्ल्ड कप, वेस्ट इंडिज व अमेरिकेत २०२४ मध्ये होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱी चॅम्पियन ट्रॉफी या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. २०२६ मध्ये भारत-श्रीलंका संयुक्तविद्यमाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे. २०२७मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया येथे वन डे वर्ल्ड कप होणार आहे.  
 

 

 

Web Title: Men’s Future Tour Program for 2023-27 announced : India to battle against Australia for five-match Test series after 30 years, India will be playing 44 Tests, 63 ODI and 76 T20I from Aug 18, 2022 to February 2027

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.