माझे पांडव! वीरेंद्र सेहवागने निवडले IPL 2023 मधील टॉप ५ फलंदाज; विराट, शुबमन यांच्या नावावर काट

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा शेवटचा सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 06:44 PM2023-05-27T18:44:07+5:302023-05-27T18:48:22+5:30

whatsapp join usJoin us
Mere 5 Pandavas! former India cricketer Virender Sehwag's top 5 batters of IPL 2023, two uncapped players, only one from overseas | माझे पांडव! वीरेंद्र सेहवागने निवडले IPL 2023 मधील टॉप ५ फलंदाज; विराट, शुबमन यांच्या नावावर काट

माझे पांडव! वीरेंद्र सेहवागने निवडले IPL 2023 मधील टॉप ५ फलंदाज; विराट, शुबमन यांच्या नावावर काट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा शेवटचा सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. GT, CSK, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांनी यंदाच्या प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के केले होते. CSK ने क्वालिफायर १ मध्ये गुजरातवर विजय मिळवून फायनलमधील प्रवेश पक्का केला. एलिमिनेटरमध्ये MI ने LSGवर ८१ धावांनी विजय मिळवताना क्वालिफायर २ मध्ये जागा पटकावली. पण, या सामन्यात गुजरातकडून त्यांना ६२ धावांनी हार पत्करावी लागली. 

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने यंदाच्या पर्वात तीन शतकांसह सर्वाधिक ८५१ धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय विराट कोहलीने दोन शतकं झळकावली आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने IPL 2023 मधील अव्वल पाच फलंदाज निवडताना कोहली व गिल यांना बाहेर ठेवल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

क्रिकबजशी बोलताना वीरू म्हणाला,''माझे पाच पांडव... क्रिकेट पांडव.. आयपीएल २०२३ मधील माझे पाच आवडते फलंदाज आणि त्यामध्ये मी एकाही सलामीवीराची निवड केलेली नाही, कारण त्यांना फलंदाजीसाठी भरपूर संधी मिळते. माझ्या आवडत्या फलंदाजांमध्ये पहिले नाव रिंकू सिंग याचे आहे... तुम्ही मला यामागचं कारण विचारणार नाही, याची मला खात्री आहे. त्याने पाच षटकार मारून संघाला थरारक विजय मिळवून दिला, हे आधी कधी घडले नव्हते. फक्त रिंकू सिंगने ते करून दाखवले.''

''मधल्या फळीतील दुसरा फलंदाज म्हणजे शिवम दुबे... त्याने ३३ षटकार खेचले आहेत आणि १६०च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत. मागील काही हंगाम त्याच्यासाठी खास नसतील गेले, परंतु यंदा त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे,''असे वीरू म्हणाला. सेहवागने त्यानंतर RRचा सलामीवीर यशस्वी जैस्वालची निवड केली. '' तिसऱ्या क्रमांकावर सलामीवीर यशस्वी जैस्वाल याची निवड मी करतो. त्याने त्याच्या कामगिरीमुळे मला निवड करण्यास भाग पाडले. त्यानंतर सूर्यकुमार यादव याची निवड मी करेन.सर्वात शेवटी मी हेनरिच क्लासेनला निवडीन. त्याने SRHसाठी मधल्या फळीत दमदार कामगिरी करून दाखवली आहे,''असे  सेहवाने सांगितले.

Web Title: Mere 5 Pandavas! former India cricketer Virender Sehwag's top 5 batters of IPL 2023, two uncapped players, only one from overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.