सुलतानपूर : कुमार कार्तिकेय सिंग याने क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडून दिल्ली गाठली होती. तिथे त्याने खर्च भागवण्यासाठी एका कारखान्यात काम केले. काही काळानंतर त्याला कुटुंबीयांनी घरी परत बोलावले. मात्र, तो गेला नाही. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू कुमार कार्तिकेय क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी आपल्या कुटुंबापासून तब्बल ९ वर्षे ३ महिने लांब राहिला.
इतक्या वर्षांनी तो आईला आणि कुटुंबाला भेटला. कार्तिकेयने यंदाच्या रणजी चषक स्पर्धेत मध्य प्रदेशला चॅम्पियन बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यापूर्वी या डावखुऱ्या लेगस्पिनरने आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना विशेष छाप पाडली.
दिल्लीत त्याला दिल्लीकडून खेळण्याची संधीही मिळाली नव्हती. स्थानिक क्रिकेटमध्ये सुरुवात मध्य प्रदेशकडूनच करावी लागली. तेथूनच मुंबई इंडियन्समध्येही निवड झाली. कार्तिकेयने आयपीएलमध्ये मिळालेली संधी साधताना शानदार गोलंदाजी केली.
आईला भेटल्यानंतर कार्तिकेय भावुक
क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले, त्यानंतर ९ वर्षे ३ महिन्यांनी कार्तिकेय कुटुंबाला भेटायला आला. इतक्या वर्षांनी जेव्हा तो त्याच्या आईला भेटला. तेव्हा त्याचे मन भरून आले. यामुळे सोशल मीडियावर फोटो शेअर करताना भावना व्यक्त करणे त्याला कठीण गेले. त्याने लिहिले, ‘९ वर्षे ३ महिन्यांनी मी माझ्या आईला आणि कुटुंबाला भेटलो. माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही.’
Web Title: met Mother after nine years; Kumar Karthikeya left home for cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.