सलाम; आईच्या निधनानंतरही 'तो' देशासाठी मैदानावर परतला, क्रिकेटविश्वात कौतुक

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीचा अचून मिलाफ साधत वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक मालिका विजयाला गवसणी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 12:17 PM2019-02-04T12:17:44+5:302019-02-04T12:18:00+5:30

whatsapp join usJoin us
Met by a standing ovation, Alzarri Joseph has chosen to bat for the West Indies and for the memory of his mother Sharon. | सलाम; आईच्या निधनानंतरही 'तो' देशासाठी मैदानावर परतला, क्रिकेटविश्वात कौतुक

सलाम; आईच्या निधनानंतरही 'तो' देशासाठी मैदानावर परतला, क्रिकेटविश्वात कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ॲटिंग्वा, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीचा अचून मिलाफ साधत वेस्ट इंडिजनेइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक मालिका विजयाला गवसणी घातली आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात दणदणीत आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात कर्णधार जेसन होल्डर आणि केमार रॉच यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजनेइंग्लंडवर 10 विकेट्सनी मात केली आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने  तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यात लक्ष्यवेधी ठरला तो अल्जारी जोसेफ... आईच्या निधनाची वार्ता येऊनही तो केवळ देशासाठी मैदानावर परतला.

वेस्ट इंडिजच्या संघाचा गोलंदाज जोसेफ आईच्या निधनानंतर काही कालावधीतच सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर परतला. 22 वर्षीय जोसेफने देशाकडून खेळताना आपल्या वैयक्तिक आयुष्याला कमी महत्त्व दिले पाहिजे, याचे उदाहरण दिले. 



जोसेफची आई शेरॉन यांचे निधन शनिवारी सकाळी झाले. मागील काही दिवसापासून ती आजारी होती. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सर्व सहकारी खेळाडूंनी काळ्या फिती बांधून जोसेफच्या आईला श्रद्धांजली वाहिली. संघ व्यवस्थापक रॉल लुइस यांनी सांगितले की, जोसेफच्या आईचे निधनामुळे आम्ही दुःखी आहोत. तो आणि त्याचा परिवार लवकरात लवकर सावरेल अशी आशा व्यक्त करतो.


काही दिवसपूर्वी अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतरही तो बिग बॅश लीगमधील सामन्यासाठी मैदानावर उतरला होता.


 

 

Web Title: Met by a standing ovation, Alzarri Joseph has chosen to bat for the West Indies and for the memory of his mother Sharon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.