ॲटिंग्वा, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीचा अचून मिलाफ साधत वेस्ट इंडिजनेइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक मालिका विजयाला गवसणी घातली आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात दणदणीत आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात कर्णधार जेसन होल्डर आणि केमार रॉच यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजनेइंग्लंडवर 10 विकेट्सनी मात केली आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यात लक्ष्यवेधी ठरला तो अल्जारी जोसेफ... आईच्या निधनाची वार्ता येऊनही तो केवळ देशासाठी मैदानावर परतला.
वेस्ट इंडिजच्या संघाचा गोलंदाज जोसेफ आईच्या निधनानंतर काही कालावधीतच सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर परतला. 22 वर्षीय जोसेफने देशाकडून खेळताना आपल्या वैयक्तिक आयुष्याला कमी महत्त्व दिले पाहिजे, याचे उदाहरण दिले.