भारतीय संघाचे माजी फलंदाज संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांच्या मता विराट कोहलीनं ( Virat Kohli) त्याच्या सध्याच्या फलंदाजीच्या शैलीचा पुनर्विचार करायला हवा. त्याची ही शैली फ्रंट फूट खेळावर अधिक अवलंबून आहे आणि त्याचा हा अप्रोच त्याला अधिक बचावात्मक मोडमध्ये घेऊन जाणारा आहे, असे मांजरेकर यांना वाटते. भारताचा तिसऱ्या कसोटीतील पहिला डाव २२३ धावांवर गडगडला अन् त्यात विराटनं सर्वाधिक ७९ धावा केल्या आहेत. कंबरेला उसण भरल्यामुळे विराटला दुसऱ्या कसोटीत खेळता आले नव्हते.
३३ वर्षीय विराटनं या खेळीसाठी २०१ चेंडूंचा सामना केला आणि त्यात त्यानं १२ चौकार व १ षटकार लगावला. त्यानं १५८ चेंडूंत अर्धशतक झळकावलं आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे संथ अर्धशतक ठरले. पण, हाच जुना विराट असता तर त्यानं किमान १३० धावा केल्या असत्या असे मत मांजरेकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,''विराटला त्यानं फलंदाजी कशी करावी, असे त्याला सांगण्याची गरज नाही. तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. रॉजर फेडररसोबत दौऱ्यावर त्याचे कोचही असतात आणि सतत कामगिरी कशी उंचावता येईल, याबाबत ते त्याला सांगत असतात. प्रत्येक खेळाडूला असा प्रकारचं मार्गदर्शन हवं असतं. आणि विराटची आताची खेळाची पद्धत त्याला अधिक अडचणीत आणू शकते. ''
दरम्यान, मांजरेकरांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खेळीत विराटच्या मानसिक कणखरतेचे कौतुक केले. ''विराट कोहलीनं चांगली फलंदाजी केली. त्याला सहकाऱ्यांकडून साथ मिळाली नाही आणि त्यामुळे त्याचे शतक हुकले. पण, जुन्या ढंगातला विराट असता तर त्यानं नक्कीच १३० धावा केल्या असत्या. राहुल द्रविडनं त्याला मुक्तपणे खेळ, असे सांगायला हवं.''
भारताच्या २२३ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या दिवसात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याची विकेट घेतली आणि दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात त्यानं आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. एडन मार्करामचा त्रिफळा उडवून बुमराहनं आफ्रिकेची अवस्था २ बाद १७ अशी केली. उमेश यादवनं तिसरा धक्का देताना केशव महाराजला ( २५) त्रिफळाचीत केले.
Web Title: 'This Method is Making His life More Difficult': Sanjay Manjrekar on Virat Kohli's Batting Approach in Cape Town
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.