ठळक मुद्दे‘मीटू’चे वादळ आता क्रिकेट जगतामध्येही येऊन धडकले आहे.
मुंबई : ‘मीटू’चे वादळ आता क्रिकेट जगतामध्येही येऊन धडकले आहे. भारतीय एअर होस्टेसने एका क्रिकेटपटूवर विनयभंगाचा आरोप केला आहे. 'एका कर्णधाराने माझा विनयभंग करण्याचा प्रकार केला, पण त्याला चांगलाच धडा शिकवला,' असे या एअर होस्टेसने आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे.
एअर होस्टेसने याबाबत सांगितले की, " मी आणि माझी मैत्रीण एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा आम्हाला हा क्रिकेट संघ दिसला. हे खेळाडू तेव्हा चांगलेच प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांची ऑटोग्राफ घ्यावी, असे आम्ही ठरवले. या संघातील कर्णधाराची ऑटोग्राफ घ्यायला आम्ही गेलो. तेव्हा त्याने आम्हाला ड्रींक्स ऑफर केले, पण मी ते घेतले नाही. यानंतर त्या कर्णधाराने माझा विनयभंग केला. त्यावेळी मी त्याच्या पायावर जोरात लाथ मारली आणि माझी सुटका करून घेतली. त्यावेळी मी त्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी कुणीही मला प्रतिसाद दिला नाही. "
भारतीय एअर होस्टेसचा विनयभंग करणारा कर्णधार कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा एक विश्वविजेता कर्णधार आहे. १९९६ साली श्रीलंकेने विश्वचषक जिंकला होता. या संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगाने विनयभंग केल्याचा आरोप एअर होस्टेसने केला आहे.
Web Title: #MeToo: srilankan legend arjuna ranatunga accused of harassment by indian air hostess
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.