IPL 2023 Schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. महिला प्रीमिअर लीग ४ ते २६ मार्च या कालावधीत पार पडणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 रंगणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. १० फ्रँचायझींसह आयपीएलचे हे सलग दुसरे पर्व असणार आहे आणि २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये फ्रँचायझींची वाट लावणार आहे. ३१ मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( CSK vs GT) यांच्या लढतीने होणार आहे.
दोन गटांत विभागणी
- ग्रुप ए - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
- ग्रुप बी - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स
गुवाहाटी आणि धर्मशाला या दोन नव्या शहरांमध्ये यंदाच्या आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. एकूण १२ स्टेडियमवर साखळी फेरीतील ७० सामने खेळवले जातील. १८ डबल हेडर सामने असतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर ७ आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर ७ सामने खेळतील. मुंबई इंडियन्सला मागील पर्वात तळाला समाधान मानावे लागले होते आणि त्यांना १४ पैकी ४ सामने जिंकता आले होते. पण, यंदाच्या पर्वात जोफ्रा आर्चरच्या येण्याचे संघाला ताकद मिळाली आहे. त्याच्यासोबत जसप्रीत बुमराहला पाहण्यासाठी MI फॅन्स उत्सुक झाले आहेत. पण, १७.५ कोटी मोजून संघात घेतलेल्या कॅमेरून ग्रीनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. MI ने झाय रिचर्डसन व जेसन बेहरेनडॉर्फ यांनाही ताफ्यात घेतले आहे.
MI full schedule in IPL 2023 :
- २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून
- ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- ११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून
- १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
- १८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून
- ९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- १२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- १६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल