Join us  

एसव्हीआयएस (बोरीवली), अंजुमन इस्लाम (सीएसटी) आणि शारदाश्रम विद्यामंदिर (दादर) विजेते

MI Junior Interschool Cricket Tournament 14 मुले गटाच्या अंतिम फेरीत फायनलमध्ये एसव्हीआयएस (बोरीवली) संघाने 16 वर्षांखालील विजेत्या अंजुमन इस्लाम स्कूलच्या संघावर 8 विकेट राखून मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 3:52 PM

Open in App

MI Junior Interschool Cricket Tournament एमआय ज्युनियर आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले, 16 वर्षांखालील मुले आणि 15 वर्षांखालील मुली गटात अनुक्रमे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल-एसव्हीआयएस(बोरीवली), अंजुमन इस्लाम (सीएसटी) आणि शारदाश्रम विद्यामंदिर (दादर) संघांनी जेतेपद पटकावले.

MI Junior Interschool Cricket Tournament 14 मुले गटाच्या अंतिम फेरीत फायनलमध्ये एसव्हीआयएस (बोरीवली) संघाने 16 वर्षांखालील विजेत्या अंजुमन इस्लाम स्कूलच्या संघावर 8 विकेट राखून मात केली. अंजुमन इस्लामने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 40 षटकांत 164 धावा केल्या. त्यात सामनावीर वर्धन पटेलचे (28 धावांत 3 विकेट) सर्वाधिक योगदान राहिले. युग असोपा (107 चेंडूंत नाबाद 64 धावा) आणि ऋषभ गुप्ताने (62 चेंडूत नाबाद 58 धावा) उपयुक्त फलंदाजी करताना एसव्हीआयएसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

16 वर्षांखालील मुले गटाच्या अंतिम फेरीत अभिज्ञान कुंडू (87 चेंडूंत 160 धावा) आणि आर्यन चौहान यांच्या (79 चेंडूत 113 धावा) धडाकेबाज शतकांनी  अंजुमन इस्लाम संघाला डॉन बॉस्को, माटुंगा संघाविरुद्ध 141 धावांनी विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना अंजुमन इस्लामने अभिज्ञान आणि आर्यनच्या शतकांमुळे 40 षटकांत 348 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल, प्रतिस्पर्धी डॉन बॉस्को संघ निर्धारित 40 षटकांत केवळ 207 धावाच करू शकला.

15 वर्षांखालील मुले गटात सेंट कोलंबा शाळेवर 8 विकेट राखून मात करताना शारदाश्रम विद्यामंदिरने ट्रॉफी उंचावली. प्रथम फलंदाजी करताना सेंट कोलंबा स्कूलने प्रतिस्पर्ध्यांसमोर 125 धावांचे लक्ष्य ठेवले.त्यात शारदाश्रमच्या मुग्धा पार्टेची (19 धावांत 3 विकेट) गोलंदाजी प्रभावी ठरली. ईरा (36 चेंडूंत नाबाद 56 धावा) आणि सारथी भाकरे यांच्या (37 चेंडूत नाबाद 43 धावा) फटकेबाजीमुळे शारदाश्रम संघाने 16.2 षटकांत विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक: (अंतिम फेरी)

14 वर्षांखालील मुले-अंजुमन इस्लाम, सीएसटी-40 षटकांत 9 बाद 164(आयुष शिंदे 38;वर्धन पटेल 3-28) पराभूत वि. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, बोरीवली-37.5 षटकांत 2 बाद 165(युग असोपा नाबाद 64, ऋषभ गुप्ता नाबाद 58). सामनावीर:वर्धन पटेल.

16 वर्षांखालील मुले-अंजुमन इस्लाम, सीएसटी-40 षटकांत 7 बाद 348(अभिज्ञान कुंडू 160, आर्यन चौहान 113; ओम कांबळे 2-36) विजयी वि. डॉन बॉस्को हायस्कूल, माटुंगा-40 षटकांत 5 बाद 207(श्रावण म्हात्रे 96; प्रणव निजई 3-35). सामनावीर: अभिज्ञान कुंडू.

15 वर्षांखालील मुली-सेंट कोलंबा स्कूल-20 षटकांत 9 बाद 124(कस्तुरी शहा 28; मुग्धा पार्टे 3-19) पराभूत वि. शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल (दादर)-16.2 षटकात 2 बाद 125/2(ईरा 56*, सारथी भाकरे 43*). सामनावीर: ईरा. 

टॅग्स :मुंबई इंडियन्समुंबई
Open in App