ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीगमधील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या नावावर आणखी एक जेतेपद जमा झाले आहे. अमेरिकेत सुरू झालेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये ( MLC 2023 ) मुंबई इंडियन्सच्या MI New York संघाने जेतेपद पटकावले. Seattle Orcasविरुद्धच्या फायनल सामन्यात कर्णधार निकोलस पूरनने ( Nicholas Pooran) एकहाती विजय मिळवून दिला. ऑर्कासच्या १८४ धावांचा पाठलाग करताना पूरनने एकट्याने नाबाद १३७ धावांची वादळी खेळी केली. त्याने १० चौकार व १३ षटकारांचा पाऊस पाडून अवघ्या २३ चेंडूंत ११८ धावा कुटल्या आणि MI New York ला १६ षटकांत ७ विकेट्स व २४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना ऑर्कासने ९ बाद १८३ धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकने ५२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८७ धावांची खेळी केली. बाकी अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने ऑर्कासला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुबम रांजणे ( २९) व ड्वेन प्रिटोरियस ( २१) यांनी थोडाफार हातभार लावला. ट्रेंट बोल्ट ( ३-३४) व राशीद खान ( ३-९) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेऊन न्यू यॉर्क संघाला फ्रंटसीटवर बसवले.
प्रत्युत्तरात न्यू यॉर्कचे सलामीवीर स्टीव्हन टेलर ( ०) व शायन जहांगिर ( १०) हे ६२ धावांवर माघारी परतले. डेवॉल्ड ब्रेव्हिसही ( २०) रन आऊट झाला. पण, निकोलसने त्यानंतर एकहाती फटकेबाजी केली. त्याने ५५ चेंडूंत १० चौकार व १३ षटकार खेचून नाबाद १३७ धावा केल्या. टीम डेव्हिड १० धावांवर नाबाद राहिला.
Web Title: MI NEW YORK ARE THE CHAMPIONS OF MLC 2023, captain Nicholas Pooran scored 137* in just 55 balls with 10 fours and 13 sixes, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.