Join us  

MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा 

MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिला सामना एकतर्फी झाला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 3:40 PM

Open in App
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सविरुद्धची पराभवाची पाच सामन्यांची मालिका CSKने खंडित केलीमुंबई इंडियन्सचे 163 धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्सनं 5 विकेट्स राखून पार केलंअंबाती रायुडू आणि फॅफ डू प्लेसिस यांनी अर्धशतकी खेळी केली

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिला सामना एकतर्फी झाला. पहिल्या डावात सामन्याचे पारडे दोन्ही संघांच्या पारड्यात झुलते राहिले. कधी मुंबई वरचढ होताना दिसला, तर कधी चेन्नई... पण, CSKच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत MIच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. त्यानंतर अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला. इतक्या दिवसानंतर क्रिकेट सुरू झाल्यामुळे सर्वांनाच या सामन्याची उत्सुकता होती, परंतु लॉकडाऊनमुळे घरी रहावे लागलेल्या खेळाडूंना मैदानावर पाहून सर्वांना धक्का बसला. खेळाडूंचे वाढलेलं 'पोट' पाहून सोशल मीडियावर चर्चेचा फड रंगला. ( IPL 2020 Live Updates, Click here

भारताचा माजी हॉकीपटू विरेन रक्वेन्हा यांनी ट्विट केलं की,''मी गल्ली क्रिकेट पलिकडे क्रिकेट खेळलेलो नाही, परंतु पण IPL2020च्या पहिल्या सामन्यात अनफिट खेळाडू पाहून मला धक्काच बसला. एवढ्या उच्च स्तरावर खेळाडूंचा अशा प्रकारचा फिटनेस, याची कल्पना करू शकत नाही.''  

''आजच्या सामन्यात काही खेळाडूंचे कमरेचा घेर वाढलेला पाहायला मिळाला,''असे ट्विट समालोचक हर्षा भोगले यांनी  केले. 

मुंबई-चेन्नई सामन्याचे हायलाईट्स

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या.

सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. मुंबईने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 86 धावा केल्या. पण, 11 व्या षटकात MIला तिसरा धक्का बसला. 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजानं त्याला बाद केलं. फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf  du Plessis ) सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. तिवारी 31 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 42 धावांत बाद झाला. त्याच षटकात फॅफनं आणखी एक सुरेख झेल टिपून हार्दिक पांड्याला माघारी पाठवले. हार्दिकने 14 धावा केल्या.

CSKच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत MIच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली.  मुंबई इंडियन्सला ( MI) 20 षटकांत 9 बाद 162 धावांवर समाधान मानावे लागले. लुंगी एनगिडीनं 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं ( 42/2) दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. 

धावांचा पाठलाग करताना CSKचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. शेन वॉटसन ( 4) आणि मुरली विजय ( 1) यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. रायुडू आणि डू प्लेसिसनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रायुडू 70 धावांवर असताना कृणाल पांड्यानं त्याचा झेल सोडला. पण, त्याच षटकात राहुल चहरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर रायुडूचा सुरेख झेल टिपला. रायुडू 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 71 धावांवर माघारी परतला. 

फॅफने 42 धावांत अर्धशतक पूर्ण केले. दीड वर्षानंतर मैदानावर उतलेल्या धोनीला पहिल्याच चेंडूंवर पंचांनी बाद दिले. पण,  DRSघेत धोनीनं पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात विजयासाठी 5 धावांची गरज असताना फॅफनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. पुढच्या चेंडूवर चौकार खेचून फॅफनं CSKला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

गचाळ क्षेत्ररक्षणानं मुंबई इंडियन्सचा घात केला; रायुडू-फॅफनं CSKला विजय मिळवून दिला 

Record; एकही धाव न काढता महेंद्रसिंग धोनीनं साजरं केलं अनोखं शतक! 

रोहित शर्माची घेतलेली विकेट पीयूष चावलासाठी ठरली विक्रमी 

मुंबई इंडियन्स इथे गमावली सामन्यावरील पकड; डू प्लेसिसचे झेल ठरले टर्निंग पॉईंट

 

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स