Join us  

Ruturaj Gaikwad  MI vs CSK IPL 2022 : ऋतुराज गायकवाड Mumbai Indians विरुद्ध सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडणार; आयपीएलमध्ये इतिहास घडवणार!

IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमधील El Classico लढत आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 6:19 PM

Open in App

IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमधील El Classico लढत आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हे आयपीएलमधील दोन यशस्वी संघ एकमेकांना भिडणार आहेत. आयपीएल २०२२मध्ये CSK व MI या दोघांनाही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईला ६ पराभव पत्करावे लागले आहेत, तर चेन्नईने सहापैकी एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी करो वा मरो असाच आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तो आज महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा विक्रम मोडू शकतो.  

मागील पर्वातील ऑरेंज कॅप विजेत्या ऋतुराजने आयपीएलमध्ये २८ डावांमध्ये ९४७ धावा केल्या आहेत आणि १००० धावा करण्यासाठी त्याला ५३ धावांची गरज आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने ५३ धाव केल्यास तो सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडेल. आज किंवा पुढील सामन्यात ऋतुराज ५३ धावा करण्यात यशस्वी झाल्यास आयपीएलमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १००० धावांचा विक्रम तो स्वतःच्या नावावर करेल. सचिन तेंडुलकरने ३१ डावांमध्ये १००० धावा केल्या आहेत. सुरेश रैना ( ३४ डाव), देवदत्त पडिक्कल ( ३५ डाव), रिषभ पंत ( ३५ डाव) व रोहित शर्मा ( ३७ डाव) यांचाही विक्रम ऋतुराज मोडू शकतो. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराजने ६ सामन्यांत १०८ धावा केल्या आहेत आणि ७३ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे,  

टॅग्स :आयपीएल २०२२ऋतुराज गायकवाडचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकर
Open in App