Join us  

MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडियानं स्वतःच्या संघाला काढला चिमटा, ट्विट व्हायरल

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 23, 2020 8:48 PM

Open in App

MI vs CSK Latest News: Indian Premier League ( IPL 2020) च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचित कधी झाली असावी. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांना निम्मा संघ तंबूत परतला होता. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंजांची लय भारी कामगिरी करताना CSKच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. चेन्नई सुपर किंग्सनं IPLमधील सर्वाच निचांक धावसंख्येचा विक्रम टाळला असला तरी त्यांना समाधानकारक खेळ करता आला नाही. 

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज ( ०) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं दोन धक्के दिले. अंबाती रायूडू  ( २) व नटराजन  ( ०) सलग दोन चेंडूवर माघारी परतले. चेन्नईची अवस्था ३ बाद ३ अशी झाली होती. ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला ( १) बाद करून CSKला मोठ्या अडचणीत आणले. रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी या जोडीवरच CSK फॅन्सचा भरवसा होता, परंतु बोल्टनं जडेजाला बाद करून त्यांची कोंडी केली.

चेन्नईचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी परतला होता. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा निम्मा संघ पहिल्या पॉवर प्लेमध्ये तंबूत परतला आहे. धोनीनं सातव्या षटकात खणखणीत षटकार मारून आशेचा किरण दाखवला, परंतु राहुल चहरनं चतुराईनं पुढच्याच चेंडूवर धोनीला ( १६) माघारी जाण्यास भाग पाडले. चेन्नई सुपर किंग्सचे ७ फलंदाज ४३ धावांत माघारी परतले होते. सॅम कुरननं एक खणखणीत षटकार खेचून चेन्नईला अर्धशतकी पल्ला ओलांडून दिला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडियानं स्वतःच्या संघाला चिमटा काढला... आयपीएलमध्ये सर्वबाद ४९ ही सर्वात निचांक खेळी आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं २०१७मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ ४९ धावांत माघारी पाठवला होता. चेन्नईनं ही धावसंख्या ओलांडल्यानंतर CSKच्या सोशल मीडिया टिमनं सुटकेचा निश्वास टाकला. 

 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स