सॅम कुरनने अर्धशतक करत अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि चेन्नईला शतकीपार धावसंख्या गाठुन दिली आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाला आपल्या २०० व्या सामन्यात किमान समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले आहे. असे असले तरी या आधी चेन्नईच्या संघाची निचांकी कामगिरी ही ७९ धावांची होती. तीही मुंबईच्याच विरोधात दुसºया डावात खेळताना त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यावेळी अंबाती रायुडूहा मुंबईच्या संघात होता. तर पहिल्या डावात खेळताना सीएसकेची निचांकी कामगिरी ही १०९ धावांची आहे. राजस्थान विरोधात खेळताना त्यांनी ही कामगिरी केली होती. या दोन्ही सामन्यात सीएसकेला पराभव स्विकारावा लागला होता. आजच्या सामन्यात रुतुराज गायकवाड आणि एन.जगदीशन यांना संधी मिळाली मात्र दोघांनाही संधीचे सोने करता आले आहे.
सीएसकेची निचांकी कामगिरीदुसºया डावात७९ सीएसके वि. मुंबई इंडियन्स, मुंबई २०१३पहिल्या डावात१०९ सीएसके वि. राजस्थान रॉयल्सजयपूर २००८
सर्वाधिक टी २० सामने खेळलेले आयपीएल संघमुंबई इंडियन्स २१९आरसीबी २०६कोलकाता नाईट रायडर २०४चेन्नई सुपर किंग्ज २००दिल्ली कॅपिटल्स १९५किंग्ज इलेव्हन पंजाब १९१राजस्थान रॉयल्स १६५सनरायजर्स हौदराबाद १२४