IPL 2020ला सुरुवात होण्यापासून चेन्नई सुपर किंग्स संघामागे लागलेलं संकट पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. सुरेश रैना व हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर Chennai Super Kings ( CSK) ची स्पर्धेतील कामगिरी कशी झाली, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. फॅफ ड्यू प्लेसिस वगळता त्यांच्या अन्य कोणत्याच खेळाडूला सातत्य राखता आले नाही. त्यांना १० सामन्यांत ७ पराभव पत्करावे लागले आहेत. त्यांना अजूनही संधी आहे, परंतु एक पराभव आणि त्यांची Exit पक्की. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध आज पराभव झाल्यास CSKचे आव्हान संपुष्टात येईल.
तीन वेळच्या आयपीएल विजेत्या संघाची सर्व गणितं यंदा चुकलेली पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं CSKचे कान टोचले. आयपीएल दरम्यान सेहवाग सोशल मीडियावर त्याच्या मस्करी शैलीत व्हिडीओ अपलोड करत आहे. त्यानं कालही असाच एक व्हिडीओ अपलोड केला आणि चेन्नईच्या संघाचे कान टोचले. 'वीरू की बैठक' असे त्याच्या मालिकेचे नाव आहे आणि त्यात त्यानं म्हटलं की, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील मोठा सामना असतो. चेन्नईनं पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केले, परंतु त्यानंतर ते विजय मिळवणेच विसरले आहेत आणि त्यांचा संघ सिनिअर सिटिझन क्लब अधिक वाटत आहे.
पाहा व्हिडीओ...
ब्राव्होची दुखापतीमुळे माघार, सीएसकेच्या अडचणीत भर
दुबई : आयपीएलच्या तेराव्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्ज संघापुढील अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. सततच्या पराभवांमुळे गुणतालिकेत तळाच्या स्थानावर फेकल्या गेलेल्या चेन्नईला आणखी धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असून तो लवकरच आपल्या घरी जाणार आहे. चेन्नईचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.
दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना ब्राव्होला दुखापत झाली होती. यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला विश्रांती दिली. मात्र दुखापतीचे गंभीर स्वरूप पाहता ब्राव्होने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून तो लवकरच आपल्या घरी जाणार असल्याचे विश्वनाथन यांनी सांगितले. एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नई संघ यंदा चांगलाच संकटात सापडला.
स्पर्धेला सुरुवात होण्याआधी रैना-हरभजन यांनी घेतलेली माघार, खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण, स्पर्धेदरम्यान प्रमुख खेळाडूंचे दुखापतग्रस्त होणे यामुळे हा संघ लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. त्यातच ब्राव्होच्या जाण्यामुळे चेन्नईला जबर धक्का बसला. ब्राव्हो यंदा सहा सामने खेळला.
Web Title: MI vs CSK Latest News : 'Senior Citizen's Club'- Virender Sehwag comes up with new term for MS Dhoni-led CSK ahead of MI face-off
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.