MI vs CSK Latest News: Indian Premier League ( IPL 2020) च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचित कधी झाली असावी. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंजांची लय भारी कामगिरी करताना CSKच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. चेन्नई सुपर किंग्सनं IPLमधील सर्वाच निचांक धावसंख्येचा विक्रम टाळला असला तरी त्यांना समाधानकारक खेळ करता आला नाही. सॅम कुरननं ( Sam Curran) एकहाती खिंड लढवताना संघाची लाज वाचवली. त्यानं अर्धशतकी खेळी केली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.
MI vs CSK Latest News & Live Score :
प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांनी दमदार खेळ करताना मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. इशान किशन ३७ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहीला. क्विंटन डी'कॉकनं ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सनं दहा विकेट्स राखून विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्सचे Play Offमध्ये प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला.
प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांनी दमदार खेळ करताना ७ षटकांत बिनबाद ६४ धावा केल्या.
जसप्रीत बुमराह ( २/२५), राहुल चहर ( २/२२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नॅथन कोल्टर नायलनं एक विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक ( ४/१८) विकेट्स घेतल्या. सॅम कुरननं ४७ चेंडूंत ५२ धावा केल्या आणि त्या जोरावर चेन्नईला ९ बाद ११४ धावा करता आल्या.
चेन्नई सुपर किंग्सचे ७ फलंदाज ४३ धावांत माघारी परतले होते. सॅम कुरननं एक खणखणीत षटकार खेचून चेन्नईला अर्धशतकी पल्ला ओलांडून दिला. कुरन आणि शार्दूल ठाकूर यांची २८ धावांची भागीदारी नॅथन कोल्टर-नायलनं संपुष्टात आणली. ठाकूर ११ धावांवर माघारी परतला
चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडियानं स्वतःच्या संघाला काढला चिमटा, ट्विट व्हायरल
चेन्नईचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी परतला होता. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा निम्मा संघ पहिल्या पॉवर प्लेमध्ये तंबूत परतला आहे. धोनीनं सातव्या षटकात खणखणीत षटकार मारून आशेचा किरण दाखवला, परंतु राहुल चहरनं चतुराईनं पुढच्याच चेंडूवर धोनीला ( १६) माघारी जाण्यास भाग पाडले. चेन्नई सुपर किंग्सची इतकी वाईट अवस्था केल्यानंतर मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावरही त्यांची टिंगल उडवली.
मुंबई इंडियन्सचा 'सोशल' अटॅक; चेन्नई सुपर किंग्सली उडवली खिल्ली!
चेन्नईचा निम्मा संघ २१ धावांवर माघारी परतला होता. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा निम्मा संघ पहिल्या पॉवर प्लेमध्ये तंबूत परतला आहे. धोनीनं सातव्या षटकात खणखणीत षटकार मारून आशेचा किरण दाखवला, परंतु राहुल चहरनं चतुराईनं पुढच्याच चेंडूवर धोनीला ( १६) माघारी जाण्यास भाग पाडले.
चेन्नई सुपर किंग्सची वाईट अवस्था; IPL इतिहासात प्रथमच त्यांच्यासोबत 'हे' घडतंय
चेन्नई सुपर किंग्सचे ४ फलंदाज ३ धावांत तंबूत; सामन्यापूर्वी केलेलं 'ते' ट्विट व्हायरल!
करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं दोन धक्के दिले. अंबाती रायूडू व नटराजन सलग दोन चेंडूवर माघारी परतले. चेन्नईची अवस्था ३ बाद ३ अशी झाली होती.
Mumbai Indians XI: सौरभ तिवारी, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर-नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
Chennai Super Kings XI: सॅम कुरन, फॅफ ड्यू प्लेसिस, राहुल गायकवाड, अंबाती रायुडू, नटराजन जगदीसन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, जोश हेझलवूड, दीपक चहर, इम्रान ताहीर, शार्दूल ठाकूर
रोहित शर्माला विश्रांती घेण्याचा सल्ला; मुंबई इंडियन्सनं दिले अपडेट्स
शाहजातील संघांची कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स - तीन सामन्यांत १ विजय व २ पराभव
मुंबई इंडिय्सन - २ सामन्यांत १ विजय व १ पराभव
रोहित शर्मा अनफिट? सलामीसाठी 'हा' खेळाडू बसतोय फिट; मुंबई इंडियन्सने दिले संकेत!
आज कोणते विक्रम तुटणार
- महेंद्रसिंग धोनीला आज आयपीएलमध्ये CSKकडून १०० झेल पूर्ण करण्यासाठी ६ झेल घ्यावे लागतील.
- अंबाती रायुडू व फॅफ ड्यू प्लेसिस यांना IPLमध्ये अनुक्रमे ३०० व २०० चौकार पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे २ व १ चौकराची गरज आहे.
- आयपीएलमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी जसप्रीत बुमराहला ३ विकेट्स हव्या आहेत.
- किरॉन पोलार्डनं ३७ धावा केल्यास तो आयपीएलमध्ये ३००० धावांचा पल्ला पार करेल.
Web Title: MI vs CSK Live Score Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2020 Live Score and Match updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.