Join us  

MI vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सकडून अजिंक्य रहाणेचे पदार्पण अन् नोंदवला मोठा विक्रम

MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात   सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 11, 2020 8:34 PM

Open in App

MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात   सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. उभय संघांच्या गोलंदाजी आक्रमणामध्ये भेदकता आहे. वेगवान गोलंदाजीचा विचार करता मुंबई इंडियन्सचे पारडे वरचढ भासते. ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांच्याकडे अपार अनुभव असून ते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे शिखर धवनवर दिल्ली संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील. MI vs DC Latest News & Live Score 

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात दिल्लीनं अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व अॅलेक्स केरी यांना स्थान दिले. IPL 2020मधील अजिंक्यचा हा पहिलाच सामना होता आणि त्यात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. 

DelhiCapitals (Playing XI): पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, अॅलेक्स केरी, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्वीन, कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्ट्झे

Mumbai Indians (Playing XI): क्विंटन डी'कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या. जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह 

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीला साजेशी सुरुवात करता आली नाही. ट्रेंट बोल्टनं तिसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ ( ४) याला बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane)  खेळपट्टीवर आला. त्याने काही सुरेख फटके मारताना क्लास दाखवला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. रहाणेला पाचव्या षटकात कृणाल पांड्यानं १५ धावांवर पायचीत केलं. त्यानंतर शिखऱ धवननं दोन विक्रम केले. IPLमध्ये त्यानं शंभर षटकार खेचले आणि दिल्लीकडून १००० धावा पूर्ण केल्या. पण, अजिंक्यचा विक्रम खास ठरला. ट्वेंटी-20त त्यानं ५००० धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरला. MI vs DC Latest News & Live Score : 

ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू विराट कोहली - ९१२३रोहित शर्मा - ८८५३सुरेश रैना - ८३९२शिखर धवन - ७४२७महेंद्रसिंग धोनी - ६७३३रॉबिन उथप्पा - ६५५५गौतम गंभीर - ६४०२दिनेश कार्तिक - ५८१५मनीष पांडे - ५५२६अजिंक्य रहाणे - ५००३* 

टॅग्स :IPL 2020दिल्ली कॅपिटल्सअजिंक्य रहाणेमुंबई इंडियन्स