Indian Premier League ( IPL 2020) रविवारी दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) ५ विकेट्स व २ चेंडू राखून सामना जिंकताना Point Tableवर अव्वल स्थान पटकावलं. मुंबई ( MI) आणि दिल्ली ( DC) यांच्या खात्यात प्रत्येकी १० गुण आहेत, परंतु MI १.३२७ अशा रनरेटनं अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. या पराभवाबरोबरच DCसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. त्यांचा फॉर्मात असलेला फलंदाज दुखापतीमुळे आठवडाभर मैदानाबाहेर राहणार असल्याची माहिती कर्णधार श्रेयस अय्यर यानं दिली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिट्लसनं आजच्या संघात दोन बदल केले होते. त्यांनी अजिंक्य रहाणे व अॅलेक्स केरी यांना स्थान देताना रिषभ पंत व अँड्य्रू टे यांना विश्रांती दिली होती. पण, अजिंक्यला मोठी खेळी करण्यात अपयश आले. शिखर धवन ( ६९) आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( ४२) यांनी खिंड लढवताना दिल्लीला २० षटकांत ४ बाद १६२ धावांचा पल्ला गाठून दिला.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ५) लगेच माघारी परतला तरी क्विंटन डी'कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. आर अश्विननं ही भागीदारी तोडली. क्विंटन ३६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. यादवने ३२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावा केल्या. इशान किशनने १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांची खेळी केली. त्यांच्यामुळे मुंबईने ५ विकेट्स राखून सामना जिंकला.
पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं आणखी एक वाईट बातमी सांगितली. सामन्यानंतर अय्यर म्हणाला,''आम्हाला १०-१५ धावा कमी पडल्या. सामन्यात १७५ धावा केल्या असत्या तर निकाल वेगळा पाहायला मिळाला असता. मार्कस स्टॉयनिस रन आऊट झाला, त्याचा फटका बसला. त्यावर काम करायला हवं. क्षेत्ररक्षत्रणातही सुधारणा करण्याची गरज आहे. मुंबई इंडियन्सनं सर्व आघाड्यांवर आम्हाला चीतपट केलं.''
रिषभ पंत आजच्या सामन्यात का मुकला? या प्रश्नावर अय्यर म्हणाला,''रिषभ पंत ( Rishabh Pant) केव्हा कमबॅक करेल, याची कल्पना आम्हाला नाही. मी डॉक्टरांशी चर्चा केली, त्यांनी त्याला आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.''
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का आहे. अय्यरच्या सांगण्यानुसार रिषभ पुढील दोन सामन्यांना मुकणार आहे. दिल्लीचा पुढील सामना १४ ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्सशी, तर १७ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्सशी आहे. तो किंग्स इलेव्हन पजांबच्या सामन्यातून कमबॅक करण्याची शक्यता आहे.
Web Title: MI vs DC Latest News : Rishabh Pant is out for at least a week, according to Delhi Capitals captain Shreyas Iyer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.