MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. उभय संघांच्या गोलंदाजी आक्रमणामध्ये भेदकता आहे. वेगवान गोलंदाजीचा विचार करता मुंबई इंडियन्सचे पारडे वरचढ भासते. ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांच्याकडे अपार अनुभव असून ते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे शिखर धवनवर दिल्ली संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील. पण, या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडू व स्टाफ सदस्यांना एक भेट मिळाली. ती पाहून सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...MI vs DC Latest News & Live Score :
आयपीएलचा १३वा पर्व UAEत खेळवला जात आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात येथे सर्वांना नियमांचं काटेकोर पालन करावं लागत आहे. त्यात अनेकांना आपल्या कुटुंबीयांपासून दूर रहावं लागत आहे. या संकटकाळात कुटुंबीयांपासून दूर रहावं लागत असल्यानं ते अधिक भावनिक झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझींनी विशेष मीटिंग बोलावली होती आणि त्यात दाखवण्यात आलेल्या व्हिडीओनं सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...
दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाला,''कोरोना व्हायरसच्या संकटात आमच्यातील प्रत्येक जण तीन महिने घरापासून, घरच्यांपासून दूर आहे. कुटुंबीयांशई संपर्कात राहण्यासाठी जे करता येईल, ते प्रत्येक जण करतोय. इथे केवळ आम्हीच त्याग करत नाही, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्याग करत आहे आणि त्याचमुळे आम्ही इथे आहोत. असा एकही दिवस नाही की त्यांचा विचार डोक्यात येत नाही.''
पाहा व्हिडीओ...
आकडेवारी काय सांगतेएकूण सामने २४, मुंबई इंडियन्स १२ जिंकले, दिल्ली कॅपिटल्स १२ जिंकलेअबु धाबीतील कामगिरीमुंबई इंडियन्सनं ५ पैकी ३ सामने जिंकले २ पराभूतदिल्ली कॅपिट्सनं २ पैकी २ सामने पराभूत
आज कोणते विक्रम मोडणार?- रोहित शर्मानं ६१ धावा केल्यास मुंबई इंडियन्सकडून तो ४००० धावांचा पल्ला पार करेल- ट्रेंट बोल्टला IPLमध्ये विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २ बळींची गरज आहे- क्विंटन डी'कॉकने तीन बळी टिपल्यास IPLमध्ये तो ५० बळी पूर्ण करेल- हार्दिक पांड्याला झेलचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी दोन झेल घ्यावे लागतील- रिषभ पंत व शिखर धवन यांना IPLमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करण्यासाठी १ उत्तुंग फटका मारावा लागेल- शिखर धवनने ७ धावा करताच दिल्ली कॅपिटल्सकडून १००० धावा पूर्ण करेल