arjun tendulkar ipl । अहमदाबाद : आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्सची वाटचाल चढ उताराची राहिली आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाला आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर मुंबईने विजयाची हॅटट्रिक मारून शानदार पुनरागमन केले. पण मागील दोन सामन्यात झालेल्या पराभवामुळे मुंबईचा संघ विजयाच्या पटरीवरून खाली आल्याचे दिसते. काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT vs MI) मुंबईचा दारूण पराभव केला. खराब गोलंदाजी मुंबईच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरत आहे. यंदाच्या आयपीएलमधून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आपल्या नव्या अध्यायाची सुरूवात केली आहे.
दरम्यान, अर्जुनने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ३ बळी घेतले आहेत. पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात त्याने एकाच षटकात ३१ धावा दिल्याने त्याच्यावर टीका झाली. पण कालच्या सामन्यात त्याने २ षटकांत केवळ ९ धावा देत १ बळी घेतला. पण त्याच्या गोलंदाजीच्या गतीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच मुंबईच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनी एक मोठे विधान केले आहे. आम्ही अर्जुनच्या गतीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुजरातविरूद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, "अर्जुन जवळपास १३० प्रति तास वेगाने गोलंदाजी करतो. तो दिवसेंदिवस गोलंदाजीत सुधारणा करत आहे. एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळणे सोपे नसते. आम्ही त्याच्या गोलंदाजीची गती वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच बदल दिसेल अशी अपेक्षा आहे."
arjun tendulkar six
मुंबईचा सलग दुसरा पराभव
आयपीएल २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरूवात चांगली झाली नव्हती. पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर संघाने विजयाची हॅटट्रिक मारली. परंतु पुन्हा एकदा मुंबईचा विजयरथ थांबल्याचे पाहायला मिळते. कारण मागील दोन सामन्यांत पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून संघाला पराभव स्वीकारावा लागला. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी होती. पण सलामीचा सामना खेळल्यानंतर पंजाबविरूद्धचा सामना वगळता आर्चर दुखापतीमुळे इतर सामन्यांना मुकला आहे. मुंबईने ७ सामन्यांतील ३ सामने जिंकले असून रोहितचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने ५५ धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: mi vs gt 2023 After the loss against Gujarat, Mumbai Indians bowling coach Shane Bond made a big statement and praised Arjun Tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.