MI vs GT, IPL 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 57 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. वानखेडेवर हार्दिक आणि रोहित पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. यापूर्वी मुंबई आणि गुजरातचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. त्यात गुजरातने मुंबईचा पराभव केला होता. टॉस जिंकून हार्तिक पांड्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात मुंबईला गुजरातकडून आपल्या जुन्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. मुंबईला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकण्याची गरज आहे, तर गुजरातला हा सामना जिंकून प्लेचे ऑफचे स्थान पक्के करायचे आहे. सध्या गुजरात 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर मुंबई 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
सुरुवातीचे काही सामने हरल्यानंतर मुंबईने चांगला कमबॅक केला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी मुंबईला आजचा सामना जिंकावाच लागेल. मुंबईने अखेरच्या सामन्यात मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) सहा गडी राखून पराभव करुन गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. मुंबईने आरसीबीचे 200 धावांचे लक्ष्य 17 षटकांत पार केले.
दोन्ही संघ-
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कॅमरून ग्रीन, सुर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वाधेरा, क्रिस जॉर्डन, पियुष चावला, विष्णु विनोद, कुमार कार्तिकेय आणि जेसन बेहरनडॉर्फ.
इम्पॅक्ट प्लेयर : रमनदीप सिंह, माधवाल, ब्रेविस, संदीप वॉरियर आणि ऋतिक शौकीन.
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स : शुभमन गिल, साई सुदर्शन, केएस भरत, शिवम मावी, आरएस साई किशोर.
Web Title: MI vs GT, IPL 2023 Live Score: Rohit-Harthik head to head; Gujarat won the toss and decided to bowl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.