मुंबई - 'करो या मरो' अशा अवस्थेत असलेल्या मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा 13 धावांनी पराभव केला. प्रथम फंलदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने 181 धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईने विजयासाठी दिलेलं 182 धावांचे आव्हान पार करताना कोलकाता नाइट रायडर्सने 20 षटकांत सहा बाद 168 धावापर्यंत मजल मारु शकले. कोलकात्याकडून रॉबिन उथप्पाने तुफानी खेळी करत संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण कोलकाताच्या तळाच्या फलंदाजांनी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे मुंबईने 13 धावांनी विजय साकारला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित 20 षटकांत 181 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर सूर्यकुमार यादव आणि इव्हिन लुईस यांनी मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. या दोघांशिवाय अन्य फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. सूर्यकुमार यादवने 39 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी केली. तर इव्हिन लुईसने 28 चेंडूत 2 षटकार आणि पाच चौकरासह 43 धावांची खेळी केली. यांच्याशिवाय शेवटच्या षटकांत हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 181 पर्यंत पोहचवली. हार्दिक पांड्याने 20 चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांसह 35 धावांची खेळी केली. रोहित शर्मा आज पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कोलकाताकडून सुनिल नरीन आणि रसेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
07:39PM - 6 चेंडूत 23 धावांची गरज
07:33PM - कोलकात्याला विजयासाठी 12 चेंडूत 37 धावांची गरज आहे
07:28PM -17 षटकानंतर कोलकात्याच्या पाच बाद 139 धावा. दिनेश कार्तिक 12 धावांवर खेळत आहे. कोलकात्याला विजयासाठी 18 चेंडूत 43 धावांची गरज आहे.
07:24PM - कोलकात्याला पाचवा धक्का बसला आहे. रसेल दहा चेंडूत 9 धावा काढून बाद झाला आहे. कोलकात्याला विजयासाठी 20 चेंडूत 52 धावांची गरज.
07:08PM - कोलकात्याला चौथा धक्का, सामना रंगतदार अवस्थेत
नितेश राणा 31 धावांवर बाद. हार्दिक पांड्याने बुमराहकरवी केलं झेलबाद. कोलकाताला विजयासाठी 37 चेंडूत 65 धावांची गरज
07:01PM - 35 चेंडूत 54 धावांची खेळी करत उथप्पा बाद झाला. कोलकात्याला विजयासाठी 43 चेंडूत 70 धावांची गरज आहे.
06:57PM - राणा-उथप्पाने सावरले, कोलकात्याचे शतक
रॉबिन उथप्पाने 32 चेंडूत अर्धशतक झळकावले. याखेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले. दोन विकेट लवकर पडल्यानंतर उथप्पा आणि नितेश राणाने संघाचा डाव सावरला आहे. राणा 21 चेंडूत 28 धावांवर खेळत आहे. 12.2 षटकांत कोलकात्याच्या दोन बाद 112 धावा झाल्या आहेत.
06:35PM - सात षटकानंतर कोलकाताच्या दोन बाद 60 धावा, रॉबिन उथप्पा (13) आणि नितेश राणा (18) खेळत आहेत. कोलकाताला विजयासाठी 78 चेंडूत 122 धावांची गरज आहे.
06:29PM - सहा षटकानंतर कोलकात्याच्या दोन बाद 47 धावा
06:16PM - शुभमन गिल बाद सात धावांवर बाद झाला आहे. 3.1 षटकानंतर कोलकातच्या दोन बाद 28 धावा झाल्या आहेत.
06:14PM - कोलकात्याला पहिला धक्का , ख्रिस लिन 17 धावांवर बाद झाला आहे.
06:07PM - दोन षटकानंतर कोतकात्याच्या बिनबाद 15 धावा. शुभमन गिल दोन आणि ख्रिस लिन 9 धावांवर खेळत आहेत.
मुंबईचे वीर ढेपाळले, कोलकातासमोर 182 धावांचे आव्हान
सलामीवीर सूर्यकुमार यादव आणि इव्हिन लुईस यांनी मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. या दोघांशिवाय अन्य फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. सूर्यकुमार यादवने 39 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी केली. तर इव्हिन लुईसने 28 चेंडूत 2 षटकार आणि पाच चौकरासह 43 धावांची खेळी केली. यांच्याशिवाय शेवटच्या षटकांत हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 181 पर्यंत पोहचवली. हार्दिक पांड्याने 20 चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांसह 35 धावांची खेळी केली. रोहित शर्मा आज पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कोलकाताकडून सुनिल नरीन आणि रसेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
05:39PM - 19 षटकानंतर मुंबईच्या चार बाद 170 धावा.
05:28PM - मुंबईला चौथा धक्का, कृणाल पांड्या 14 धावांवर बाद झाला.
05:15PM - मुंबईला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद
15 व्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर रसेलने यादवला बाद केले. यादवने 39 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी केली. सध्या हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या खेळत आहे.
05:06PM - 13 षटकानंतर मुंबईच्या दोन बाद 122 धावा. सूर्यकुमार यादव 57 आणि हार्दिक पांड्या 9 धावांवर खेळत आहेत.
04:58PM : सुर्यकुमारचे अर्धशतक, रोहित शर्मा बाद
रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. रोहित शर्माला 11 धावांवर सुनील नरिनने बाद केले. रोहित शर्मा बाद होण्यापूर्वी सुर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक ठोकले. 31 चेंडूत 6 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने यादवने आपलं आर्धशतक झळकावले.
04:55PM - सूर्यकुमार तळपला, मुंबईचे शतक
11 व्या षटकांत मुंबईच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. सुर्यकुमार यादव 29 चेंडूत 48 धावांवर खेळत आहे.
04:46PM - मुंबईला पहिला धक्का, लुईस बाद
यादव आणि लुईस यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली आहे. लुईसने 28 चेंडूत 2 षटकार आणि पाच चौकरासह 43 धावांची खेळी केली. सध्या सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा सध्या खेळत आहेत. 91 धावांवर मुंबईला पहिला धक्का बसला आहे.
04:36PM - आठ षटकानंतर मुंबईच्या बिनबाद 82 धावा झाल्या आहेत. यादव आणि लुईसची जोडी जमली
04:27PM - सहा षटकानंतर मुंबईच्या बिनबाद 56 धावा.
सूर्यकुमार यादव आणि लुईस यांनी मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली आहे. सहा षटकांमध्ये मुंबईच्या 56 धावा झाल्या आहेत. सुर्यकुमार यादवनंतर लुईसनेही फटकेबाजीला सुरुवात केली. लुईसने सहाव्या षटकांत 14 धावा वसूल केल्या. सध्या सूर्यकुमार यादव 24(18), इव्हिन लुईस 32(18) धावांवर खेळत आहेत.
04:14PM - सुर्यकुमार यादवने फटकेबजीला सुरुवात केली. मिशेल जॉन्सनच्या षटकांत दोन चौकार आणि एक षटकार मारत संघाची धावसंख्या तीन षटकांत 23 वर पोहचवली. सूर्यकुमार यादव 21(12), लुईस 2(6) खेळत आहेत.
04:10PM : दोन षटकानंतर मुंबईच्या बिनबाद 8 धावा, सुर्यकुमार सहा तर इव्हिन लुईस दोन धावांवर खेळत आहेत.
04:00PM - इव्हिन लुईस आणि सुर्यकुमार यादव मुंबईकडून करणार डावाची सुुरवात, कोलकाताकडून चेंडू नितेश राणाच्या हातात.
03:35PM - कोलकाता संघ
03:35PM - मुंबई संघ -
03:30PM - कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान मुंबई प्रथम फंलदाजी करेल.
03:22PM - दोन्ही संघाचे मैदानावर आगमन, थोड्याच वेळात होणार नाणेफेक
प्रतिस्पर्धी संघ -
मुंबई संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जयप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्ताफिझूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, इशान किशन, राहुल चहर, इव्हिन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जेपी ड्युमिनी, तजींदर सिंग, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, अकिला धनंजया, अनुकूल रॉय, मोहसिन खान, एमडी निधीश, मिचेल मॅक्लेघन.
कोलकाता संघ : दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, नितीश राणा, रिंकू सिंह, शुभमन गिल, कॅमेरॉन डेलपोर्ट, शिवम मावी, टॉम कुरन, जॅवोन सीरल्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, विनय कुमार, कुलदीप यादव.