Join us  

IPL 2021: मान गये अय्यर...KKR च्या व्यंकटेश अय्यरचं IPL मधलं पहिलंवहिलं अर्धशतक, तेही अवघ्या २५ चेंडूत! 

IPL 2021, Venkatesh Iyer: अबूधाबीच्या मैदानात आज 'अय्यर...अय्यर'चा जयघोष सुरू आहे. केकेआरला एक नवं रत्न सापडलं आहे आणि त्याचं नाव आहे व्यंकटेश अय्यर.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:50 PM

Open in App

IPL 2021, Venkatesh Iyer: अबूधाबीच्या मैदानात आज 'अय्यर...अय्यर'चा जयघोष सुरू आहे. केकेआरला एक नवं रत्न सापडलं आहे आणि त्याचं नाव आहे व्यंकटेश अय्यर. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात व्यंकटेश अय्यर यानं आपल्या आयपीएलमधल्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं आहे. पण त्याचं हे अर्धशतक विशेष ठरलं आहे. कारण अय्यरनं हे अर्धशतक अवघ्या २५ चेंडूत ठोकलं आहे. 

शुबमन गिलनं फ्रंट फूटवर येत बोल्टला लगावला खणखणीत षटकार, चेंडू थेट स्टेडियम बाहेर; पाहा Video

केकेआरचा संघ सलामीसाठी शुबमन गिलला साथ देण्यासाठी खेळाडूच्या शोधात होता. अनेक प्रयोग करुन पाहिले पण संघाला काही यश येत नव्हतं. पण आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्यात एका नव्या दमाच्या युवा भारतीय खेळाडूला केकेआरनं हेरलं. व्यंकटेश अय्यर याला शुबमन गिलसोबत सलामीसाठी निवडलं. व्यंकटेशनंही आपली निवड सार्थ ठरवत पहिल्याच सामन्यात चुणूक दाखवून दिली होती. व्यंकटेश अय्यरनं २१ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर आज गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध व्यंकटेश अय्यरनं तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. 

सनरायझर्स हैदराबादच्या अष्टपैलू खेळाडूनं घेतला 'बायो-बबल' सोडण्याचा निर्णय, मायदेशी रवाना होणार

व्यंकटेश अय्यरनं ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अॅडम मिल्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गोलंजांना निर्भीडपणे सामोरं जात जोरदार फटकेबाजी केली आहे. व्यंकेटशनं आज ३० चेंडूत ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली आहे. यात त्याचा स्ट्राइक रेट तब्बल १७६.६६ इतका राहिला आहे. अय्यरनं आपल्या डावात ३ उत्तुंग षटकार आणि ४ खणखणीत चौकार ठोकले आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्स
Open in App