Join us  

Best Photo of the Match, MI vs KKR IPL 2022 Live Updates : आजच्या सामन्यातील सर्वात भारी Photo; Mumbai Indians चे फॅन असाल तर यातील महत्त्व सहज ओळखाल

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करून मुंबई इंडियन्सला ५५ धावांवर ३ धक्के दिले होते. पण, अजिंक्य रहाणेने कॅच सोडून जीवदान दिलेल्या तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ४९ चेंडूंत ८३ धावा चोपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 10:11 PM

Open in App

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व किरॉन पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ( MI) आजच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) समोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. कर्णधार रोहित शर्मा ३ धावांवर बाद झाला आणि त्यामुळे तो प्रचंड निराश दिसला. पण, आजच्या सामन्यातील एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबई इंडियन्सचे फॅन्सच या फोटोतील महत्त्व ओळखू शकतील... 

उमेश यादवने तिसऱ्या षटकात चतुराईने रोहित शर्माची विकेट घेतली. पदार्पणवीर डेवॉल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली.  इशान किशनला ( १४) पॅट कमिन्सने बाद केले. १३व्या षटकात तिलक वर्माला जीवदान मिळाले. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला.  किरॉन पोलार्डने त्यानंतर त्या षटकात तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पोलार्ड ५ चेंडूंत ३ षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला.   

व्हायरल झालेल्या फोटोत मुंबई इंडियन्सचे फॅन्स मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि प्रत्येकाने रोहित शर्माची ४५ क्रमांकाची जर्सी घातली आहे.   प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यरने सावध सुरुवात केली. ५व्या षटकात टायमल मिल्सने टाकलेला चेंडू अजिंक्यने भिरकावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो डॅनिएल सॅम्सने टीपला. अजिंक्य ७ धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने चौकाराने सुरुवात केली, परंतु मुंबई इंडियन्सने रणनीती आखून त्याची विकेट घेतली. सॅम्सच्या स्लोव्हर बाऊन्सरवर अय्यरचा फटका चूकला आणि तिलक वर्माने त्याला सोपा झेल घेतला. कोलकाताने ६ षटकांत ३५ धावांत २ विकेट्स गमावल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App