Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्स आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बदलांसह मैदानावर उतरले आहेत. KKR च्या ताफ्यात पॅट कमिन्स परतला आहे, तर जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय रसिख सलाम पदार्पण करत आहे. MI नेही दोन बदल करताना सूर्यकुमार यादवसाठी अनमोलप्रीत सिंगला बाकावर बसवले, तर दक्षिण आफ्रिकेचा Baby AB डेवॉल्ड ब्रेव्हिस पदार्पण करणार आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहे डेवॉल्ड ब्रेव्हिस?
डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis ) हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. यावर्षी पार पडलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा या युवा फलंदाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आयपीएल ऑक्शनमध्ये २० लाख मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये त्याने नाव नोंदवले होते आणि पंजाब किंग्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात त्याच्यासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु मुंबई इंडियन्सने एन्ट्री घेत युवा खेळाडूला ३ कोटींमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
एबी डिव्हिलियर्सचा ( AB de Villiers) जबरा फॅन असलेला आणि त्याच्याचसारखी ३६० डिग्री फलंदाजी करणाऱ्या ब्रेव्हिसला त्याचे मित्र व सहकारी Baby AB नावाने बोलवतात.१८ वर्षीय ब्रेव्हिसने वेस्ट इंडिज येथे झालेल्या Under-19 World Cup स्पर्धेत त्याने ६ सामन्यात सर्वाधिक ५०६ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यात त्याने भारताविरुद्ध ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर यूगांडाविरुद्ध १०४ धावा ( ११० चेंडू) व २-१८ वि. यूगांडा, ९६ धावा ( १२२ चेंडू) वि. आयर्लंड, ९७ धावा ( ८८ चेंडू) व २-४० वि. इंग्लंड, ६ धावा व १-५२ वि. श्रीलंका आणि १३८ धावा वि. बांगलादेश अशी कामगिरी केली होती.
Web Title: MI vs KKR IPL 2022 Live Updates : Dewald Brevis makes his IPL debut for Mumbai Indians, know who is Baby AB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.