Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीला अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) एका चूकीचा मोठा फटका बसला. मुंबई इंडियन्सचे ( MI) आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर KKRला आणखी एक महत्त्वाची विकेट मिळाली असती, परंतु अजिंक्यने पुढे पुढे करण्याच्या प्रयत्नात झेल सोडला. त्याच तिलक वर्माने ( Tilak Varma) नंतर KKRच्या गोलंदाजांना सूर्यकुमार यादवसह ( Suryakumar Yadav) झोडून काढले. दुखापतीतून सावरल्यानंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या सूर्याने नुस्ता राडा घातला..
फॉर्मात असलेल्या उमेश यादवने अपेक्षित सुरुवात करून दिली आणि त्याच्या मदतीला रसिख होताच... उमेशने तिसऱ्या षटकात चतुराईने रोहित शर्माची विकेट घेतली. चेंडूची लाईन लेंथ सतत बदलत राहून त्याने शॉर्ट बॉलवर रोहितला फटका मारण्यास भाग पाडले. रोहितचा फटका चूकला अन् चेंडू जागच्या जागी उत्तुंग उडाला. यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सने चूक न करता रोहितला ३ धावांवर माघारी पाठवले. रोहित बाद झाल्यानंतर ब्रेव्हिस मैदानावर आला आणि खणखणीत चौकार खेचून खाते उघडले. त्यानंतर त्याने दोन षटकार व आणखी एक चौकार खेचला. १९ चेंडूंत २९ धावांची त्याची ही खेळी वरूण चक्रवर्थीने संपुष्टात आणली.
सावध खेळ करणाऱ्या इशान किशनला ( १४) पॅट कमिन्सने बाद केले. KKRच्या गोलंदाजांची कांमगिरी उल्लेखनीय झालेली दिसली. १३व्या षटकात तिलक वर्माला जीवदान मिळाले. बिलिंग्सच्या हाती असलेला कॅच अजिंक्य रहाणेने घेण्याचा प्रयत्न केला अन् त्याच्याकडून झेल सूटला. त्यानंतर पुढीच चेंडूवर सुर्याने अपर कट मारून षटकार खेचला. अजिंक्यने दिलेल्या जीवदानाचा तिलक वर्माचे पूरेपूर फायदा उचलला आणि सूर्यासह ३४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
सूर्यकुमारने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने मुंबईला धक्का दिला, सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. किरॉन पोलार्डने त्यानंतर त्या षटकात तीन षटकार खेचून
मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: MI vs KKR IPL 2022 Live Updates : Sam Billings and Ajinkya Rahane mess up a catch, Suryakumar Yadav goes for a brilliant 52, Tilal Varma score 38, Mumbai indian set 162 runs target
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.