MI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video

MI vs KKR Latest News :  Hardik goes a little too deep and cuts his own stumps, He's out hit-wicket, Video

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 09:56 PM2020-09-23T21:56:17+5:302020-09-23T21:57:16+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KKR Latest News :  Hardik goes a little too deep and cuts his own stumps, He's out hit-wicket, Video | MI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video

MI vs KKR Latest News : हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीनं झाला बाद; चाहत्यांना केलं निराश, पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. CSKविरुद्धचा पराभव विसरून मुंबई इंडियन्सने आज जी फटकेबाजी केली ती लाजवाब होती. रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना हतबल केले. घरी बसून त्याच्या फकेबाजीचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येक चाहत्याला आपण स्टेडियममध्ये का नाही याची खंत नक्कीच वाटली असेल. रोहित- सूर्यकुमार यांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने मोठी धावसंख्या उभारता आली असती, परंतु अखेरच्या षटकात विकेट गमावल्यानं MI ला दोनशेपार जाता आले नाही. 

(MI vs KKR Latest News & Live Score)

रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल

Kolkata Knight Ridersने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मात्र आधीच्या चार सामन्यांपैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या  संघानेच जिंकला आहे.  या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला ( Kieron Pollard ) सामन्यापूर्वी 150 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. मुंबई इंडियन्सकडून 150वा आयपीएल सामना खेळणारा पोलार्ड हा पहिलाच खेळाडू आहे.  (MI vs KKR Latest News & Live Score)

रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम

मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MIच्या डावाला आकार दिला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितनं मारलेला षटकार लाजवाब होता. IPL 2020 Auctionमधील सर्वात महागडा गोलंदाज पॅट कमिन्सच्या षटकात रोहितनं दोन खणखणीत Six मारले. रोहित-सुर्यानं अर्धशतकी भागीदारी करताना संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 59 धावा करून दिल्या. 


11व्या षटकात रोहित-सुर्या यांची 90 धावांची भागीदारी तुटली. सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहितनं सूत्र हाती घेताना 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. यादव बाद झाल्यानंतर आलेल्या सौरभ तिवारीनंही तिसऱ्या विकेटसाठी रोहितसह 49 धावा जोडल्या. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर तो ( 21) झेलबाद होऊन माघारी परतला. मुंबई इंडियन्सनं 16 षटकात 150 धावा पूर्ण केल्या. 

रोहित आणि हार्दिक पांड्या यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीनं MIने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली. पॅट कमिन्सला त्यांनी धु धु धुतले... पण, 18व्या षटकात रोहितचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. शिवम मावीनं ( Shivam Mavi) रोहितला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून 80 धावा चोपल्या. हार्दिक पांड्याही विचित्र पद्धतीनं हिट विकेट झाला. सलग विकेट गेल्यानं मुंबईला मात्र दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. अखेरच्या षटकांत KKRने त्यांना रोखले. MIला 20 षटकांत 5 बाद 195 धावा करता आल्या. 

पाहा व्हिडीओ

आयपीएल मध्ये हिट विकेट

हार्दिक पांड्या- 2020
रियान पराग- 2019
शेल्डन जॕकसन- 2017
युवाराज सिंग- 2016
दीपक हुडा- 2016
डेव्हिड वाॕर्नर- 2016
सौरभ तिवारी- 2012
रवींद्रा जडेजा- 2012
स्वाप्नील असनोदाकर- 2009
मिसबा उल हक- 2008
मुसावीर खोटे- 2008

Web Title: MI vs KKR Latest News :  Hardik goes a little too deep and cuts his own stumps, He's out hit-wicket, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.