MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) ने Indian Premier League ( IPL 2020) च्या सलामीच्या सामन्यातील CSKविरुद्धचा पराभव विसरून आज जो सांघिक खेळ केला, तो लाजवाब होता. रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना धु धु धुतले. रोहित- सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यानंतर MIच्या गोलंदाजांनी खेळपट्टी व वातावरणाशी जुळवून घेत सुरेख गोलंदाजी केली. त्यात KKRने संघातील स्फोटक फलंदाजांना मागे राखण्याची चूक पुन्हा केली आणि त्यांच्या पराभवाला ती कुठेतरी कारणीभूत ठरली. (MI vs KKR Latest News & Live Score)
रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम
किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय
Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल
Kolkata Knight Ridersने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MIच्या डावाला आकार दिला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितनं मारलेला षटकार लाजवाब होता. 11व्या षटकात रोहित-सुर्या यांची 90 धावांची भागीदारी तुटली. सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहितनं सूत्र हाती घेताना 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. यादव बाद झाल्यानंतर आलेल्या सौरभ तिवारीनंही तिसऱ्या विकेटसाठी रोहितसह 49 धावा जोडल्या. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर तो ( 21) झेलबाद होऊन माघारी परतला.
रोहित आणि हार्दिक पांड्या यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीनं MIने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली. पॅट कमिन्सला त्यांनी धु धु धुतले... पण, 18व्या षटकात रोहितचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. शिवम मावीनं ( Shivam Mavi) रोहितला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून 80 धावा चोपल्या. हार्दिक पांड्याही विचित्र पद्धतीनं हिट विकेट झाला. सलग विकेट गेल्यानं मुंबईला मात्र दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. अखेरच्या षटकांत KKRने त्यांना रोखले. MIला 20 षटकांत 5 बाद 195 धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKRला मुंबईच्या गोलंदाजांनी इंगा दाखवला. जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी अचूक व भेदक मारा करताना KKRच्या फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. त्याच दडपणात शुबमन गिल आणि सुनील नरीन यांनी विकेट्स फेकल्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये MIच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांनी KKRच्या डावाला आधार दिला. ही डोईजड होऊ पाहणारी जोडी राहुल चहरनं ( Rahul Chahar) ने तोडली. त्यानं 11व्या षटकात कार्तिकला ( 30) पायचीत केले. 150वा आयपीएल सामना खेळणाऱ्या किरॉन पोलार्डच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्यानं सीमारेषेवर सुरेख झेल टिपून नितिश राणाला ( 24) माघारी जाण्यास भाग पाडले.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. आंद्रे रसेल अनफिट असल्यासारखा दिसत होता. रसेल, मॉर्गन हे स्फोटक फलंदाज संघात असूनही नितिश राणाला आधी पाठवल्यानेही KKRवर टीका होत होती. आघाडीच्या फलंदाजांच्या संथ खेळीमुळे धावा व चेंडू यांच्यातले अंतर खूपच वाढले होते. KKRला शंभर धावांचा पल्ला गाठण्यासाठी 15व्या षटकाची प्रतीक्षा पाहावी लागली. 16व्या षटकात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) ने KKRला धक्का देत रसेलचा त्रिफळा उडवला. त्याच षटकार मॉर्गनची विकेट घेत बुमराहनं MIचा विजय पक्का केला.
रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम
रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला
पॅट कमिन्सनं 18व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चार षटकारांसह 27 धावा कुटल्या. कमिन्स 12 चेंडूंत 4 षटकारांसह 33 धावा करून माघारी परतला. MIने हा सामना 49 धावांनी जिंकला. KKRला 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या.