Join us  

वानखेडेवर नारीशक्तीचा जागर! मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला; टॉसला हरमनप्रीत कौरची हजेरी

MI vs KKR Live Match : आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 3:07 PM

Open in App

IPL 2023, MI vs KKR Live Match Updates । मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2023) १६ व्या हंगामातील बाविसावा सामना आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात खेळवला जात आहे. वानखेडे स्टेडियमर आपल्या घरच्या मैदानावर मुंबईचा संघ आज नितीश राणाच्या केकेआरशी भिडत आहे. आजचा सामना मुंबईचा संघ मुलींना समर्पित करत असल्याने नाणेफेकीसाठी यजमान संघाकडून महिला प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर (harmanpreet kaur) आली. विशेष बाब म्हणजे आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार आहे. सूर्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा पोटदुखीमुळे बाकावर असणार आहे. 

केकेआरचा कर्णधार नितीश राणाने देखील सूर्याच्या निर्णयाचे स्वागत केले आणि आम्हाला देखील प्रथम फलंदाजी करायची होती असे राणाने म्हटले आहे. आज आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पदार्पण करत आहे.

खरं तर आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप खास असणार आहे. कारण आजचा सामना मुंबईचा संघ मुलींना समर्पित करणार असून १९,००० लेकी या सामन्याच्या साक्षीदार होणार आहेत. आज मुंबई इंडियन्स वानखेडेवर एक अनोखा उपक्रम साजरा करत आहे. ३६ NGO मधील 19000 पेक्षा जास्त मुली आणि 200 अपंग मुले मुंबईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत. लक्षणीय बाब म्हणजे हा विशेष सामना म्हणजे क्रीडा क्षेत्रातील महिलांचा उत्सव असल्याचे नीता अंबानी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीच्या मालक नीता अंबानी दरवर्षी हा अनोखा उपक्रम राबवत असतात. मुलींचे शिक्षण आणि खेळाच्या अधिकारावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे यावेळी नीता अंबानी यांनी सांगितले. मुंबई इंडियन्सला आपल्या सुरूवातीच्या ३ सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरात पराभव करून मुंबईने विजयाचे खाते उघडले. आताच्या घडीला मुंबईचा संघ गुणतालिकेत २ गुणांसह नवव्या स्थानावर स्थित आहे. आज कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध मुंबई आपला चौथा सामना खेळत आहे. या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने यजमान मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे आज मुंबई विजय मिळवून गुणतालिकेत भरारी घेणार का हे पाहण्याजोगे असेल.

सामन्याआधी ज्युनिअर तेंडुलकरसोबत मास्टर ब्लास्टर

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सनीता अंबानीहरनमप्रीत कौररोहित शर्मा
Open in App