इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनमध्ये आज दोन सामने रंगणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्धकोलकाता नाईट रायडर्स होणार असून दूसरा सामना गुजरातविरुद्ध राजस्थानचा रंगणार आहे. केकेआरच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान रोहित शर्माच्या संघासमोर असेल. दुपारी ३.३० वाजता हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई इंडियन्सने शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आपली पराभवाची मालिका खंडित केली. तर कोलकाता नाईट रायडर्सचा सनराईस हैदराबादने पराभव केला. शेवटचा सामना जिंकूनही मुंबई इंडियन्सचा संघ दडपणाखाली असेल. रोहितने मुंबईसाठी दिल्लीविरुद्ध ६५ धावा केल्या, पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. तर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म सुरुच आहे.
केकेआरला आज रोखायचे असेल तर नितीश राणा, रिंकू सिंग या आक्रमक फलंदाजांची लवकरच विकेट घ्यावी लागेल. टीम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, टिळक वर्मा आणि इशान किशन या युवा ब्रिगेडकडून मुंबईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तर आंद्रे रसेलचा खराब फॉर्म केकेआरसाठी चिंतेचा विषय आहे.
अशी असू शकते Playing XI
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड/जेसन बेहरेनडॉर्फ (प्रभावी खेळाडू), नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला आणि रिले मेरेडिथ.
कोलकाता नाईट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, व्यंकटेश अय्यर/सुयश शर्मा (प्रभावी खेळाडू), नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल/डेव्हिड वेस, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.