MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) ने Indian Premier League ( IPL 2020) च्या सलामीच्या सामन्यातील CSKविरुद्धचा पराभव विसरून आज सांघिक खेळ केला. रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना धु धु धुतले. रोहित - सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यानंतर MIच्या गोलंदाजांनी खेळपट्टी व वातावरणाशी जुळवून घेत सुरेख गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सने 49 धावांनी हा सामना जिंकला. (MI vs KKR Latest News & Live Score)
रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम
किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय
Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल
Kolkata Knight Ridersने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी 90 धावांची भागीदारी करताना MIच्या डावाला आकार दिला. सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून 80 धावा चोपल्या. MIला 20 षटकांत 5 बाद 195 धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKRला मुंबईच्या गोलंदाजांनी इंगा दाखवला. जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी अचूक व भेदक मारा करताना KKRच्या फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. त्याच दडपणात शुबमन गिल आणि सुनील नरीन यांनी विकेट्स फेकल्या. कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांनी KKRच्या डावाला आधार दिला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. पॅट कमिन्सनं 18व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चार षटकारांसह 27 धावा कुटल्या. कमिन्स 12 चेंडूंत 4 षटकारांसह 33 धावा करून माघारी परतला. KKRला 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या.
या सामन्यात 80 धावा करणारा रोहित शर्मा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला. यासह त्यानं IPLमध्ये सर्वाधिक 18 मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूचा मान पटकावला. त्यानं
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) ला मागे टाकले.
Most Man of the Match Awards in IPL:
ख्रिस गेल - 21
एबी डिव्हिलियर्स - 20
रोहित शर्मा - 18
महेंद्रसिंग धोनी, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, युसूफ पठाण- 17
रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम
रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला
Web Title: MI vs KKR: Rohit Sharma now holds the record of most Man Of The Match awards by an Indian in IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.