MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे सामना रंगत आहे. दोन्ही संघांना मागच्या सामन्यात प्रतिस्पर्धींकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे IPL 2020त पुन्हा विजयपथावर येण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. रोहित शर्मा ( Rohit Sharma)नं या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून IPLमध्ये 5000 धावांचा पल्ला पार केला. त्याने दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी दमदार फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारून दिली.
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. KXIPनं आजच्या सामन्यात एम अश्विनच्या जागी के गोवथमला संधी दिली आहे आणि मुंबई इंडियन्सनं मागच्या सामन्यातील संघ कायम राखला आहे. पहिल्याच षटकात शेल्डन कोट्रेलनं MIचा सलामीवीर क्विंटन डी'कॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्या षटकात रोहित शर्मानं KXIP गोलंदाज मोहम्मद शमीचे चौकारानं स्वागत केलं. चौथ्या षटकात लोकेश राहुलनं चेंडू रवी बिश्नोईच्या हाती सोपवला. त्याच्या फिरकीवर रोहितला धाव घेताना चाचपडताना दिसला. त्यामुळेच पाचव्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव ( 10) धावबाद झाला. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) भारी फिल्डिंग करताना सूर्यकुमार यादवला धावबाद केले.
रोहित अन् इशान किशन ( Ishan Kishan) यांनी मुंबईचा डाव सावरला. इशान 23 धावांवर असताना रवी बिश्नोईनं त्याला जीवदान दिलं. जिमी निशमच्या गोलंदाजीवर इशाननं मारलेला फटका चुकला.... तो टिपण्यासाठी बिश्नोईनं डाईव्ह मारली, परंतु त्याच्या हातून झेल सुटला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्याची 62 धावांची भागीदारी 13व्या षटकात कृष्णप्पा गोवथमनं ( K. Gowtham) तोडली. इशान 28 धावांवर माघारी परतला.
रोहितनं 40 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. IPL मधील हे त्याचे 38वे अर्धशतक ठरले. त्यानंतर रोहितनं गिअर बदलला आणि फटकेबाजीला सुरुवात केली. जिनी निशॅमनं टाकलेल्या 16व्या षटकात त्यानं 22 धावा कुटल्या. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami)नं रोहितचं वादळ रोखलं. रोहित 45 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 70 धावांवर माघारी परतला. शमीच्या चेंडूवर रोहितनं मारलेला फटका सीमारेषेनजीक ग्लेन मॅक्सवेलनं पकडला, परंतु तोल जात असल्याचे समजताच त्यानं तो सीमारेषे आत असलेल्या जिमी निशॅमकडे सोपवला अन् रोहितला माघारी जावे लागले.
हार्दिक पांड्याचं ( Hardik Pandya) वादळानं KXIPच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्याच्या साथीला पोलार्ड होताच. या दोघांनी अखेरच्या तीन षटकांत 50+ धावा चोपल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं 4 बाद 191 धावा केल्या. हार्दिकनं 11 चेंडूंत नाबाद 30, तर पांड्यानं 20 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे दहा फलंदाज
विराट कोहली - 180 सामने, 5430 धावा
सुरेश रैना - 193 सामने, 5368 धावा
रोहित शर्मा - 192 सामने, 5068 धावा
डेव्हिड वॉर्नर - 129 सामने, 4793 धावा
शिखर धवन - 162 सामने, 4648 धावा
एबी डिव्हिलियर्स - 157 सामने, 4529 धावा
ख्रिस गेल - 125 सामने, 4484 धावा
महेंद्रसिंग धोनी - 193 सामने, 4476 धावा
रॉबिन उथप्पा - 180 सामने, 4427 धावा
गौतम गंभीर - 154 सामने, 4217 धावा
IPL मध्ये 5000 धावांचा पल्ला गाठणारा तीनही खेळाडू भारतीय आहेत आणि या तिघांनीही भारताच्या जलदगती गोलंदाजांच्या चेंडूंवर 5000वी धाव घेतली.
सुरेश रैना वि. उमेश यादव, 2019
विराट कोहली वि. जसप्रीत बुमराह, 2019
रोहित शर्मा वि. मोहम्मद शमी, 2020 ( आज)
Web Title: MI vs KXIP Latest News : Batsmen reaching 5000 runs milestone in IPL, In all three cases, there was an Indian fast bowler at the bowling end
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.