MI vs KXIP Latest News : दोन गुणांच्या महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) पूर्ण जीव ओतून खेळ केला. लोकेश राहुलच्या दमदार खेळीनंतरही पंजाबला बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं मुंबई इंडियन्सला बरोबरीत रोखले. किंग्स इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab) सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) रोखून सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी मुंबई इंडियन्सला १ बाद ११ धावा करून दिल्या. KXIPच्या ख्रिस गेलनं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला त्यानंतर एक धाव व मयांक अग्रवालनं चौकार खेचला. पुन्हा एक चौकार खेचून त्यानं पंजाबचा विजय पक्का केला.
मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विटन डी'कॉकनं ४३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात पोलार्ड व नॅथन कोल्टर नायर यांनी दोन षटकार व दोन चौकारांसह २२ धावा चोपून काढल्या. या दोघांनी नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात पंजाबला चौथ्या षटकांत मयांक अग्रवालच्य रुपानं पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी ४२ धावांची भागीदारी केली. गेल चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु राहुल चहरच्या फिरकीच्या जाळ्यात तो अडकला. गेल २४ धावा ( १ चौकार व २ षटकार) करून बाद झाला. निकोलस पुरननेही ताबडतोड खेळी केली, पण त्याचा अडथळा दूर करण्यासाठी रोहितनं बुमराहला बोलावलं आणि हा डाव यशस्वी ठरला. पूरन १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावांवर माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेलचा ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरनं त्याला बाद केले.
१८ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं सामना फिरवला. त्यानं पंजाबचा अखेरचा आशास्थान असलेल्या लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. लोकेशनं ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावा केल्या. दीपक हुडाचा झेल सोडणं मुंबई इंडियन्सला महागात पडलं असतं. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी ९ धावांची गरज असताना ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर हुडाचा झेल सुटला. पण, पंजाबला १ धावेवर समाधान मानावे लागले. बोल्टनं पंजाबला ५ बाद १७६ अशा बरोबरीत रोखून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.
सुपर ओव्हरचा थरार
जसप्रीत बुमराह गोलंदाजीपहिल्या चेंडूवर लोकेश राहुलची एक धावदुसऱ्या चेंडूवर निकोलस पूरन झेलबादतिसऱ्या चेंडूवर लोकेश राहुलची एक धावचौथ्या चेंडूवर दीपक हुडाची एक धावपाचव्या चेंडूवर लोकेश राहुलच्या दोन धावासहाव्या चेंडूवर लोकेश राहुल बाद
मोहम्मद शमी गोलंदाजीपहिल्या चेंडूवर क्विंटन डी'कॉकची एक धावदुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माची एक धावतिसऱ्या चेंडूवर क्विंटन डी'कॉकची एक धावचौथ्या चेंडूवर शून्य धावपाचव्या चेंडूवर रोहित शर्माची एक धावसहाव्या चेंडूवर एक धाव अन् सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये
दुसरी सुपर ओव्हर
ख्रिस जॉर्डन गोलंदाजीपहिल्या चेंडूवर किरॉन पोलार्डची एक धावदुसरा चेंडू वाइडतिसऱ्या चेंडूवर हार्दिकी पांड्याची एक धावचौथ्या चेंडूवर किरॉन पोलार्डचा चौकारपाचवा चेंडू वाइडसहाव्या चेंडूवर दुसरी धाव घेताना हार्दिक पांड्या धावबादसातवा चेंडू निर्धावआठव्या चेंडूवर मयांक अग्रवालनं अडवला षटकार, मुंबईला मिळाल्या दोन धावा ( MI -१ बाद ११)
ट्रेंट बोल्टची गोलंदाजीपहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलचा षटकारदुसऱ्या चेंडूवर ख्रिस गेलची एक धावतिसऱ्या चेंडूवर मयांक अग्रवालचा चौकारचौथ्या चेंडूवर मयांक अग्रवालचा चौकार