Join us  

MI vs KXIP Latest News : विराट, रोहित यांच्याआधी लोकेश राहुलनं मिळवला पहिला मान; IPL 2020 ठरतोय 'हिट'!

MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 10:46 PM

Open in App

MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांनी MIला सुरुवातीलाच धक्के देत बॅकफुटवर पाठवले. पण, क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock)च्या अर्धशतकानंतर किरॉन पोलार्ड व नॅथन कोल्टर-नायर यांनी फिनिशिंग टच देताना मुंबई इंडियन्सला मोठं आव्हान उभं करून दिलं. किंग्स इलेव्हन पंजाबलाही धक्के बसत राहिले. पण, कर्णधार लोकेश राहुलनं अर्धशतकी खेळ करताना खिंड लढवली. लोकेशनं या खेळीसह IPL 2020त मोठा पराक्रम केला. 

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात रोहित शर्माला ( ९) माघारी पाठवून KXIPनं मोठं यश मिळवलं. अर्शदीप सिंगनं हिटमॅनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू न देता बाद केले. अर्शदीपनं ६व्या षटकात इशान किशनला ( ७) बाद करून MIला कोंडीत पकडले. क्विंटन डी'कॉक एका बाजूनं खिंड लढवत आहे. क्विंटन आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची ५८ धावांची भागीदारी रवी बिश्नोई यानं तोडली. कृणाल ३४ धावांवर माघारी परतला.

मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्यानं पहिल्याच चेंडूंवर खणखणीत षटकार खेचला. क्विटन डी'कॉकनं सातत्यपूर्ण खेळ करताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, ख्रिस जॉर्डननं MI ला धक्का देताना क्विंटनचा झंझावात रोखला. क्विंटन ४३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा करून माघारी परतला. किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात पोलार्ड व नॅथन कोल्टर नायर यांनी दोन षटकार व दोन चौकारांसह २२ धावा चोपून काढल्या.  या दोघांनी नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात पंजाबला चौथ्या षटकांत मयांक अग्रवालच्य रुपानं पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी ४२ धावांची भागीदारी केली. गेल चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु राहुल चहरच्या फिरकीच्या जाळ्यात तो अडकला. गेल २४ धावा ( १ चौकार व २ षटकार) करून बाद झाला. निकोलस पुरननेही ताबडतोड खेळी केली, पण त्याचा अडथळा दूर करण्यासाठी रोहितनं बुमराहला बोलावलं आणि हा डाव यशस्वी ठरला. पूरन १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावांवर माघारी परतला. लोकेश राहुलनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलचा ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरनं त्याला बाद केले.

IPL 2020त ५०० धावा करण्याचा पहिला मान लोकेश राहुलनं पटकावला. शिवाय त्यानं सर्वाधिक ५ अर्धशतकं व एक शतकही आतापर्यंत या मोसमात झळकावलेले आहे. लोकेशनं सलग तिसऱ्या पर्वात ५००+ धावा करतान ख्रिस गेलच्या ( २०११-१३) विक्रमाशी बरोबरी केली. डेव्हिड वॉर्नरनं २०१४ ते २०१७ च्या पर्वात सलग चार वेळा ५००+ धावा केल्या होत्या.   

टॅग्स :IPL 2020लोकेश राहुलकिंग्स इलेव्हन पंजाबमुंबई इंडियन्स