MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे सामना रंगत आहे. दोन्ही संघांना मागच्या सामन्यात प्रतिस्पर्धींकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे IPL 2020त पुन्हा विजयपथावर येण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्यात आज धावांचा पाऊस कोण पाडतो, याची सर्वांना उत्सुकता आहेच. रोहितनं या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून IPLमध्ये 5000 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. पण, रोहितनं या विक्रमानंतर आणखी एक विक्रम नावावर केला. MI vs KXIP Latest News & Live Score
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. KXIPनं आजच्या सामन्यात एम अश्विनच्या जागी के गोवथमला संधी दिली आहे आणि मुंबई इंडियन्सनं मागच्या सामन्यातील संघ कायम राखला आहे. पहिल्याच षटकात शेल्डन कोट्रेलनं MIचा सलामीवीर क्विंटन डी'कॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्या षटकात रोहित शर्मानं KXIP गोलंदाज मोहम्मद शमीचे चौकारानं स्वागत केलं. चौथ्या षटकात लोकेश राहुलनं चेंडू रवी बिश्नोईच्या हाती सोपवला. त्याच्या फिरकीवर रोहितला धाव घेताना चाचपडताना दिसला. त्यामुळेच पाचव्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव ( 10) धावबाद झाला. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) भारी फिल्डिंग करताना सूर्यकुमार यादवला धावबाद केले. MIला पहिल्या दहा षटकांत 2 बाद 62 धावा करता आल्या. MI vs KXIP Latest News & Live Score
रोहित अन् इशान किशन ( Ishan Kishan) यांनी मुंबईचा डाव सावरला. इशान 23 धावांवर असताना रवी बिश्नोईनं त्याला जीवदान दिलं. जिमी निशमच्या गोलंदाजीवर इशाननं मारलेला फटका चुकला.... तो टिपण्यासाठी बिश्नोईनं डाईव्ह मारली, परंतु त्याच्या हातून झेल सुटला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्याची 62 धावांची भागीदारी 13व्या षटकात कृष्णप्पा गोवथमनं ( K. Gowtham) तोडली. इशान 28 धावांवर माघारी परतला. रोहितनं 40 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
IPL मधील हे त्याचे 38वे अर्धशतक ठरले. यासह त्यानं सुरेश रैनाच्या ( Suresh Raina) 38 अर्धशतकांच्या विक्रमांशी बरोबरी केली. IPLमध्ये सर्वाधिक अर्धशतकं डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) नावावर आहेत. त्यानं 44 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यानंतर रोहित, रैना यांचा क्रमांक येतो. KXIPविरुद्ध हे त्याचे सहावे अर्धशतक आहे. KXIPविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकं डेव्हिड वॉर्नर ( 10), ख्रिस गेल ( 8), एबी डिव्हिलियर्स व गौतम गंभीर ( प्रत्येकी 7) हे आघाडीवर आहेत. MI vs KXIP Latest News & Live Score
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे दहा फलंदाजविराट कोहली - 180 सामने, 5430 धावासुरेश रैना - 193 सामने, 5368 धावारोहित शर्मा - 192 सामने, 5000* धावाडेव्हिड वॉर्नर - 129 सामने, 4793 धावाशिखर धवन - 162 सामने, 4648 धावाएबी डिव्हिलियर्स - 157 सामने, 4529 धावाख्रिस गेल - 125 सामने, 4484 धावामहेंद्रसिंग धोनी - 193 सामने, 4476 धावारॉबिन उथप्पा - 180 सामने, 4427 धावागौतम गंभीर - 154 सामने, 4217 धावा