MI vs KXIP Latest News & Live Score : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे एकतर्फी सामना झाला. रोहित शर्मा ( Rohit Sharma)नं दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात रोहितनं IPLमधील 5000 धावांचा विक्रम नावावर केला. त्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी दमदार फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारून दिली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावल्यानंतर MIच्या गोलंदाजांनीही त्यांच्या खांद्यावरील भार सक्षमपणे पेलला अन् संघाला विजय मिळवून दिला.
MI vs KXIP Latest News & Live Score :
- KXIPला 20 षटकांत 8 बाद 143 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सनं ( MI) हा सामना 48 धावांनी जिंकला. जसप्रीत बुमराहनं 18 धावांत दोन, राहुल चहरनं 26 धावांत दोन, जेम्स पॅटिसन्सनं 28 धावांत 2, कृणाल पांड्यानं 27 धावांत 1 विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनंही एक विकेट घेतली.
राहुल चहरच्या ( Rahul Chahar) गोलंदाजीवर स्कूप मारण्याच्या नादात KL Rahulचा त्रिफळा उडाला. KXIPनं 10 षटकांत 3 बाद 72 धावा केल्या. मुंबई इंडियन्सपेक्षा या धावा अधिक होत्या, परंतु KXIPनं एक अतिरिक्त विकेट गमावली होती. ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करताना KXIPच्या आशा कायम राखल्या. जेम्स पॅटिन्सननं ही भागीदारी संपुष्टात आणली. पूरननं 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा केल्या.
रोहित शर्माची धमाकेदार खेळी पाहा
- धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण, पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) मयांकचा ( 25) त्रिफळा उडवला. त्यानंतर कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) करुण नायरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाचीत केलं. KXIPचे दोन फलंदाज 39 धावांत माघारी पतले.
पंजाबचा अर्जुन; मोहम्मद शमीच्या अचूक थ्रोनं मुंबई इंडियन्सला दिला धक्का, Video
रोहित अन् इशान किशन ( Ishan Kishan) यांनी मुंबईचा डाव सावरला. इशान 23 धावांवर असताना रवी बिश्नोईनं त्याला जीवदान दिलं. जिमी निशमच्या गोलंदाजीवर इशाननं मारलेला फटका चुकला.... तो टिपण्यासाठी बिश्नोईनं डाईव्ह मारली, परंतु त्याच्या हातून झेल सुटला.
रोहित शर्माचा चौकार अन् नोंदवला मोठा विक्रम; विराट कोहली, सुरेश रैनाच्या पंक्तित स्थान
- सूर्यकुमार यादव धावबाद होऊन माघारी परतला
पहिल्याच षटकात शेल्डन कोट्रेलनं MIचा सलामीवीर क्विंटन डी'कॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्या षटकात रोहित शर्मानं KXIP गोलंदाज मोहम्मद शमीचे चौकारानं स्वागत केलं.
-Kings XI Punjab Team - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, करुण नायर, जिमी निशॅम, के गोवथम, एस खान, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल, रवी बिश्नोई Mumbai Indians Team - रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, जेम्स पॅटिसन्स, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
विक्रम -
- मयांक अग्रवालला IPLमधील 1500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी आज 13 धावा बनवाव्या लागतील
- लोकेश राहुलने आज 26 धावा करताच KXIPकडून तो 1500 धावा पूर्ण करेल
- IPLमध्ये 5000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी रोहित शर्मा आज केवळ दोन धावा कराव्या लागतील
- सूर्यकुमार यादवला षटकारांचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी दोन उत्तुंग फटके मारावे लागतील
अबु धाबीतील विक्रम
- KXIP - दोन सामने, दोन विजय
- MI - तीन सामने, एक विजय, दोन पराभव