Join us  

MI vs RCB : सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण

MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 8:28 PM

Open in App

MI Vs RCB 2023 Live Score । बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईकडून सलामीला आलेल्या इशान किशनला सुरूवातीपासून मोहम्मद सिराजने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सिराजचे चेंडू खेळण्यात अपयश येत असलेला किशन १३ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. तर आर टोपलेने मुंबईचा स्फोटक फलंदाज कॅमेरून ग्रीनचा त्रिफळा काढला. दरम्यान, कर्णधार रोहित पाठोपाठ आता सूर्यकुमार यादव देखील स्वस्तात बाद झाला आहे. सूर्याला मायकेल ब्रेसव्हेलने सोप्या चेंडूवर आपल्या जाळ्यात फसवला. तो १६ चेंडूत १५ धावांची खेळी करून बाद झाला. १० षटकांच्या आधीच आरसीबीने मुंबईला ४ मोठे धक्के दिले आहेत. 

अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे मालिकेत सूर्या सलग तीनवेळा शून्यावर बाद झाला होता. याशिवाय तो तिन्ही सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाल्याने त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. आजही सूर्या स्वस्तात बाद झाल्यामुळे त्याचा फ्लॉप शो सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ मागील वर्षीची निराशाजनक खेळी विसरून मैदानात उतरला आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ आयपीएलच्या जेतेपदाचा दुष्काळ मिटवण्याच्या इराद्याने उतरला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर आहे. 

मुंबई इंडियन्सचे विदेशी खेळाडू - टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

आरसीबीचे विदेशी खेळाडू - फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल आणि रीस टोपले. आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टिळक वर्मा, डेव्हिड, नेहल वढेरा, शोकीन, चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान. आजच्या सामन्यासाठी आरसीबीचा संघ - फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, मायकेल ब्रेसव्हेल, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज, दिनेश कार्तिक, हर्षल पटले, टोपले, आकाश दीप, कर्ण आणि मोहम्मद सिराज.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्ससूर्यकुमार अशोक यादवरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App