MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोन स्टार खेळाडूंचा खेळही या सामन्यात पाहायला मिळणार असल्यानं सर्वच उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. RCBच्या आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांनी अर्धशतकं झळकावली. शिवम दुबेनं ( Shivam Dube) अखेरच्या षटकात तीन खणखणीत षटकार खेचून RCBला मोठा पल्ला गाठून दिला. RCBच्या धावगतीवर लगाम लावण्याचा रोहित शर्माचा डाव मात्र फसला.
आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. दुसऱ्या व तिसऱ्या षटकात फिंचला अनुक्रमे कृणाल पांड्या व रोहित शर्मा यांनी जीवदान दिले. कृणालसाठी झेल थोडासा अवघड होता, परंतु ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटला रोहित शर्मानं फिंचचा झेल सोडला. फिंच तेव्हा अवघ्या 10 धावांवर होता. राहुल चहरनं पाचवं षटक टाकलं आणि फिंचनं त्यावर 14 धावा कुटल्या. RCBनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 59 धावा केल्या. फिंचनं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 9व्या षठकात ट्रेंट बोल्टनं RCBला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. 10व्या षटकात कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) एक अजब चेंडू टाकला. त्यानं केदार जाधव, लसिथ मलिंगा यांच्यासह स्वतःची शैली मिश्रित करून 10व्या षटकाचा पाचवा चेंडू फेकला.
एबीनं 24 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारासह नाबाद 55, तर शिवम दुबेनं 10 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या. MI कडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. जेम्स पॅटिसन्सनं 4 षटकांत 51, जसप्रीत बुमराहनं 4 षटकांत 42 धावा दिल्या. त्यांना एकही विकेट घेता आली नाही.