MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. 15व्या षटकापर्यंत RCBच्या हातात असलेला सामना किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अलगद MIच्या बाजूने झुकवला. इशान किशनच्या ( Ishan Kishan) परिपक्व खेळाला पोलार्डच्या अनुभवाची साथ लाभली आणि मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर आले होते. अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देतो की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) टिच्चून मारा करताना MI ला 1 बाद 7 धावा करू दिल्या. त्यानंतर RCBनं बाजी मारली.
आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. 9व्या षठकात ट्रेंट बोल्टनं RCBला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. 14व्या षटकात देवदत्त पडीक्कलने MIचा गोलंदाज जेम्स पॅटिसन्स ( James Pattinson ) याला सलग दोन षटकार खेचून RCBला शतकी पल्ला पार करून दिला. पडीक्कल 40 चेंडूंत 54 धावांवर माघारी परतला. त्यानंतर डिव्हिलियर्सनं 24 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारासह नाबाद 55, तर शिवम दुबेनं 10 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या. RCBनं 20 षटकांत 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला.
सुपर ओव्हरचा थरारनवदीप सैनी गोलंदाजीला/ हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड फलंदाजीलापहिला चेंडू - 1 धाव ( पोलार्ड)दुसरा चेंडू - 1 धाव ( हार्दिक)तिसरा चेंडू - 0 धाव ( पोलार्ड)चौथा चेंडू - चौकार ( पोलार्ड)पाचवा चेंडू - OUT ( पोलार्ड ) सहावा चेंडू - 1 बाय धावा ( हार्दिक)
जसप्रीत बुमराह गोलंदाजी/ एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली फलंदाजीलापहिला चेंडू - 1 धाव ( एबी) दुसरा चेंडू - 1 धाव ( विराट) तिसरा चेंडू - o धाव ( एबी) चौथा चेंडू - चौकार ( एबी) पाचवा चेंडू - 1 धाव ( एबी)सहावा चेंडू - चौकार ( विराट)