MI vs RR, IPL 2018 : कृष्णप्पा गौतमची दमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय

मोक्याच्यावेळी केलेल्या चुका महागात पडल्याने पुन्हा एकदा गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हातातील सामना गमवावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 07:39 PM2018-04-22T19:39:18+5:302018-04-23T09:09:18+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RR, IPL 2018 Live Score: MUMBAI INDIANS vs RAJASTHAN ROYALS IPL 2018 Live Updates | MI vs RR, IPL 2018 : कृष्णप्पा गौतमची दमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय

MI vs RR, IPL 2018 : कृष्णप्पा गौतमची दमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर : मोक्याच्यावेळी केलेल्या चुका महागात पडल्याने पुन्हा एकदा गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हातातील सामना गमवावा लागला. अखेरच्या ३ षटकात राजस्थान रॉयल्सला ४३ धावांची गरज असताना, गोलंदाजांनी केलेल्या सुमार माऱ्यामुळे मुंबईला ३ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६७ धावा केल्यानंतर राजस्थानने २० षटकात ७ बाद १६८ धावा करत ‘रॉयल’ बाजी मारली.

सवाई मानसिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, अडखळत्या सुरुवातीनंतर सूर्यकुमार यादव (७२) व इशान किशन (५८) यांच्यामुळे मुंबईला समाधानकारक मजल मारता आली. धावांचा पाठलाग करताना राजस्थानचीही अडखळती सुरुवात झाली. अजिंक्य रहाणे (१४), राहुल त्रिपाठी (९) स्वस्तात बाद झाल्यानंतर संजू सॅमसन व बेन स्टोक्स यांनी ७२ धावांची भागीदारी करत राजस्थानचे पुनरागमन करुन दिले. १५व्या षटकात स्टोक्स बाद झाल्यानंतर १७व्या षटकात जसप्रीत बुमराहने लागोपाठच्या चेंडूवर सॅमसन व जोस बटलर यांना बाद करुन मुंबईला पकड मिळवून दिली.

स्टोक्सने २७ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ४०, तर सॅमसनने ३९ चेंडूत ४ चौकारांसह ५२ धावा केल्या. यानंतर हेन्रिक क्लासेनही (०) हजेरी लावून परतल्याने राजस्थानची ६ बाद १२५ अशी अवस्था झाली. यावेळी मुंबई बाजी मारणार असे दिसत असतानाच बुमराह, रहमान व पाड्या यांनी सुमार मारा केला. याचा फायदा घेत क्रिष्णप्पा गौथमने ११ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३३ धावांचा विजयी ‘हल्लाबोल’ केला. बुमराह, हार्दिक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

तत्पूर्वी, पहिल्याच षटकात धवल कुलकर्णीने धोकादायक सलामीवीर एविन लेविसला त्रिफळाचीत करत मुंबईला धक्का दिला. परंतु, सूर्यकुमार व इशान यांनी सावध सुरुवातीनंतर जबरदस्त फटकेबाजी करत १३० धावांची भागीदारी करत मुंबईला सावरले. कुलकर्णीने इशानला बाद केले. केवळ २८ धावांमध्ये ६ बळी गमावल्याने मुंबईची १ बाद १३० वरुन ७ बाद १५८ अशी घसरण झाली. इशानने ४२ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ५८, तर सूर्यकुमारने ४७ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावा केल्या. रोहित (०), कृणाल पांड्या (७), हार्दिक पांड्या (४) स्वस्तात परतल्याने मुंबईचा डाव घसरला. किएरॉन पोलार्डने (२१*) मुंबईला दीडशेचा पल्ला गाठून दिला. जोफ्रा आर्चर (३/२२), धवल कुलकर्णी (२/३२) यांनी भेदक मारा करत मुंबईला रोखले.  

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकात ७ बाद १६७ धावा (सूर्यकुमार यादव ७२, इशान किशन ५८; जोफ्रा आर्चर ३/२२, धवल कुलकर्णी २/३२). पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १९.४ षटकात ७ बाद १६८ धावा (संजू सॅमसन ५२, बेन स्टोक्स ४०, क्रिष्णप्पा गौथम नाबाद ३३; जसप्रीत बुमराह २/२८, हार्दिक पांड्या २/२५.)

  •  Live Updates  

11:51PM - कृष्णप्पा गौतमची धमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय

तीन चेंडूत सहा धावांची गरज असताना कृष्णप्पा गौतमने हार्दिक पांड्याच्या चेंडूवर षटकार मारत राजस्थानला रॉयल विजय मिळवून दिला. गौतमने 11 चेंडूत 33 धावांची खेळी केली. या खेळीत गौतमने दोन षटकार आणि चार चौकार लगावले.

11:50PM 03 चेंडूत 06 धावांची गरज

11:49PM - 04 चेंडूत 06 धावांची गरज

11:44PM - राजस्थानला हार्दिकने दिला सातवा धक्का, 05 चेंडूत 10 धावांची गरज

11:41PM - 19 व्या षटकात अर्चर आणि गौतमने बुमराहची गोलंदाजी फोडून काढली. या षटकांत यांनी 18 धावा वसूल केल्या.  

11:37PM - 18 षटकानंतर राजस्थानच्या सहा बाद  140 धावा. 12 चेंडूत 28 धावांची गरज

11:33PM - 18 व्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर मुस्तफिझूर रेहमानने कालसनला बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला.  16 चेंडूत 41 धावांची गरज

11:31PM - बुमराहने 17 व्या षटकांत एक धाव देत सॅमसन आणि बटलरला बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. 

11:26PM - बुमराहने हार्दिक पांड्याकरवी सॅमसनला बाद करत मुंबईची विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकले. सॅमसनने 39 चेंडूत चार चौकारांसह 52 धावांची खेळी केली. 

11:25 - संजू सॅमसनने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 16 षटकानंतर राजस्थानच्या तीब बाद 124 धावा. विजयासाठी 24 चेंडूत 44 धावांची गरज

11:21PM - 15 षटकानंतर राजस्थानच्या तीन बाद 118 धावा. विजयासाठी 30 चेंडूत 50 धावांची गरज. संजू सॅमसन 35 चेंडूत 48 धावांवर खेळत आहे. 

11: 12PM - राजस्थानला विजयासाठी 36 चेंडूत 58 धावांची गरज, स्टोक्स 40 आणि सॅससन 43 धावांवर खेळत आहेत. 

11:07PM - राजस्थानचे शतक फलकावर लागले. 13 षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 101 धावा. सॅमसन 44 स्टोक्स 32 धावांवर खेळत आहेत. 

10:56PM - 11 षटकानंतर राजस्थान संघाने दोन बाद 86 धावा करत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. विजयासाठी 54 चेंडूत 82 धावांची गरज

10:52PM - दहा षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 70 धावा. संजू सॅमसन (29) आणि बेन स्टेक्स (16) खेळत आहेत. विजयासाठी 60 चेंडूत 98 धावांची गरज

10:43PM -  9 षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 63 धावा

10:29PM - राजस्थानला मोठा धक्का, रहाणे तंबूत

अजिंक्य राहणे 17 चेंडूत 14 धावा काढून बाद. मिचेल मॅक्लेघनने क्रृणाल पांड्याकरवी केले झेलबाद. सहा षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 43 धावा. 

10:13pm - राजस्थानला पहिला धक्का

राहुल त्रिपाठीला  यादवकरवी झेलबाद करत क्रृणाल पांड्याने राजस्थानला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठी 8 चेंडूत 9 धावांवर बाद झाला. तीन षटकानंतर राजस्थानच्या  एक बाद 31धावा. 

10:06pm - राजस्थानने पहिल्या षटकात बिनबाद 9 धावा केल्या. त्रिपाठी 7 तर अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत आहेत. 

10:01 pm -  अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठी राजस्थानकडून करणार डावाची सुरुवात, मुंबईकडून मिचेल मॅक्लेघन पहिले षटक घेऊन आला.

09:50pm - आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना जोफ्रा आर्चर

 


09:47pm - मुंबईचे वीर ढेपाळले, राजस्थानला 168 धावांचे आव्हान

जयपूर : सलग तीन पराभव पत्करल्यानंतर चौथ्या सामन्यात बलाढ्य आरसीबीला नमविल्यानंतर विजयी मार्गावर परतलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सची पुन्हा अडखळती सुरुवात झाली. राजस्थान रॉयलसने घरच्या मैदानावर खेळताना पहिल्याच षटकात हुकमी आक्रमक एविन लेविसला (०) बाद करत मुंबईकरांवर दडपण आणले. परंतु, सूर्यकुमार यादव (72) आणि युवा इशान किशन (58) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईकरांनी निर्धारित 20 षटकात 7 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानला विजयासाठी 168 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.  सवाई मानसिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, पहिल्याच षटकात मूळचा मुंबईकर असलेल्या धवल कुलकर्णी याने धोकादायक सलामीवीर एविन लुईस याला त्रिफळाचीत करत गतविजेत्यांना मोठा धक्का दिला. यावेळी, मुंबईकर पुन्हा एकदा ढेपाळणार असेच दिसत होते. परंतु, सूर्यकुमार आणि इशान यांच्या मनात वेगळेच होते. या दोघांनी खंबीरपणे उभे राहताना सावध सुरुवात केली आणि त्यानंतर जम बसल्यावर दोघांनीही राजस्थानच्या गोलंदाजीवर ‘हल्लाबोल’ केला. या दोघांनी जबरदस्त फटकेबाजी करताना 129 धावांची भागीदारी करत मुंबईला सावरले.  पण त्यानंतर मुंबईची फलंदाजी पत्याप्रमाणे ढासळली. किशन-यादव वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पोलार्डने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पोलार्डने नाबाद 21 धावांची खेळी केली. इतर फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा 00, हार्दिक पांड्या 4 , क्रृणाल पांड्या सात, मिचेल मॅक्लेघन 00 धावांवर बाद झाले. राजस्थानकडून धवल कुलकर्णीला दोन बळी, जोफ्रा आर्चरला तीन बळी मिळाले. जयदेव उनाडकडला एक बळी मिळवता आला. 

09:41pm - जोफ्रा आर्चरने 19 व्या षटकांत तीन फलंदाजांना केले बाद

09:37pm - मुंबईची पडझड, हार्दिक पांड्या तंबूत

हार्दिक पांड्या दोन चेंडूत 4 धावा काढून बाद झाला. 

09:34pm - मुंबईला पाचवा धक्का

सहा चेंडूत सात धावा काढून क्रृणाल पंड्या बाद. मुंबईच्या 18 षटकांत पाच बाद 153 धावा

09:28PM - मुंबईच्या फलंदाजांची हराकिरी, दोन षटकांत तीन गडी तंबूत

चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईच्या फंलदाजांनी हराकिरी करत विकेट बहाल  केल्या. इशान किशन बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवेनही आपली विकेट गमवली. यादवने 72 धावांची खेळी केली. यादवनंतर कर्णधार रोहित शर्मा धावबाद झाला. मोठ्या धावसंखेकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईच्या संघाला सलग तीन धक्के लागल्यामुळं धावसंखेला खिळ बसली आहे. 17 षटकानंतर मुंबईच्या चार बाद 141   धावा झाल्या आहेत. क्रृणाल पांड्या आणि पोलार्ड मैदानावर आहेत. 

09:15PM - 15 षटकानंतर मुंबईच्या दोन बाद  135 धावा. सुर्यकुमार यादव 72 आणि पोलार्ड एका धावेवर खेळत आहेत.  धवल कुलकर्णीने चार षटकांमध्ये 32 धावा देत 2 गड्यांना बाद केले. 

09:12PM - मुंबईला दुसरा धक्का, इशान किशन बाद

फटकेबाजी करण्याच्या नादात इशान किशन 58 धावांवर बाद झाला. कुलकर्णीने बटलरकरवी केले झेलबाद. 14.2 षटकानंतर मुंबईच्या दोन बाद 130 धावा.

09:10PM - 14 षटकानंतर मुंबईच्या एक बाद 129 धावा. 

09:00PM - यादवनंतर इशान किशानचेही अर्धशतक

सुर्यकुमार यादवनंतर इशान किशानने दमदार अर्धशतक केले. इशानने 35 चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकार लगावत अर्धशतक केले. 13 षटकानंतर मुंबईच्या एक बाद धावा. यादव 42 चेंडूत 69 तर किशन 35 चेंडूत 50 धावांवर खेळत आहेत. 

08:57PM - 12 षटकानंतर मुंबईच्या एक बाद 112 धावा. यादव 39 चेंडूत  3 षटकार आणि सहा चौकारांसह 66 धावांवर खेळत आहे. इशान किशन 44 धावांवर असून यादवला चांगली साथ देत आहे. यादव-इशानची शतकी भागिदारी झाली आहे. 

08:53PM - 11 षटकानंतर मुंबईच्या एक बाद 104 धावा

08:46PM - 10 षटकानंतर मुंबई एक बाद 93 धावा. सुर्यकुमार यादवचे धडाकेबाज अर्धशतक

08:40 PM - नऊ षटकांनंतर मुंबईच्या 1 बाद 75  धावा 

- सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने दमदार फलंदाजी करत मुंबईला 9 षटकांत 1 बाद 75 धावांपर्यंत मजल मारून दिली आहे.  

08:25PM -  यादव-इशानची जोडी जमली, मुंबईची अश्वासक सुरुवात

पहिल्या षटकांत स्फोटक इव्हिन लुईस बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि इशान किशनने संयमी फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. सहा षटकानंतर मुंबईने एक बाद 43 धावा केल्या. सुर्यकुमार यादव 19 चेंडूत 27 धावांवर खेळत आहेत. तर इशान किशन 16 चेंडूत 15 धावांवर खेळत आहे. 

08:21PM - पाच षटकानंतर मुंबईच्या एक बाद धावा. इशान किशन 9 आणि सुर्यकुमार यादव 21 धावांवर खेळत आहेत.

08:20PM - आयपीएलच्या 11 व्या सत्रातील 300 षटकार झाले. 

08:13PM - तीन षटकानंतर मुंबईच्या एक बाद 12 धावा. यादव 10 तर इशान किशन एका धावेवर खेळत आहेत. 

08:04PM - एका षटकानंतर मुंबईच्या एक बाद एक धाव

08:01PM - मुंबईला पहिला धक्का, इव्हिन लुईसला धवल कुलकर्णीने केले बाद

08:00PM - सुर्यकुमार यादव आणि इव्हिन लुईस मुंबईकडून करणार डावाची सुरुवात. धवल कुलकर्णी राजस्थानकडून घेऊन आला पहिले षटक

07:32PM -  राजस्थान संघ -



 

07:32PM - मुंबई संघ - 


 

07:30PM - कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

Web Title: MI vs RR, IPL 2018 Live Score: MUMBAI INDIANS vs RAJASTHAN ROYALS IPL 2018 Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.