MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगत आहे. रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. MIच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नसला तरी RRने आज तीन बदल केले आहे. जयदेव उनाडकट, रॉबीन उथप्पा आणि रियान पराग यांना संघाबाहेर केले असून यशस्वी जैस्वाल व अंकित राजपूत यांचे कमबॅक झाले आणि 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघातील मॅचविनर गोलंदाज कार्तिक त्यागी पदार्पण करणार आहे.
रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock) यांनी स्फोटक सुरुवात केली. अंकित राजपूतला टार्गेट करत दोघांनी धावा कुटल्या. राजपूतसाठी आजचा दिवस खास दिसत नव्हता. त्याच्याकडून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर क्विंटनचा झेलही सुटला. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाज कार्तिक त्यागी ( Kartik Tyagi ) कडे कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ( Steve Smith) पाचवे षटक टाकण्यासाठी चेंडू दिला. रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे स्वागत केले. पण, त्याच षटकात कार्तिकनं MIला धक्का दिला. क्विंटन डी'कॉकला ( 23) अप्रतिम बाऊंसर टाकून त्यानं झेलबाद करून माघारी पाठवले.
पाहा त्यानं घेतलेली पहिली विकेट
राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सकडून कौतुक
कोण आहे कार्तिक त्यागी? उत्तर प्रदेशच्या या गोलंदाजानं 2017मध्ये प्रथण श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, दुखापतीमुळे त्याला क्रिकेटला मुकावे लागले. पण, 2020च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यानं त्या स्पर्धेत 6 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 24 धावांत 4 विकेट्स घेतल्या. ब्रेट ली आणि विराट कोहली हे त्याचे आदर्श आहेत. भुवनेश्वर कुमार व प्रविण कुमार ज्या अकादमीतून शिकले त्याच विपिन वत्स यांच्याकडून कार्तिकने धडे गिरवले.