MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना एकतर्फी होताना दिसत आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी मुंबई इंडियन्सची लाज वाचवली. या दोघांनी राजस्थान रॉयल्स ( RR) च्या गोलंदाजांना पळो की सळो करून सोडलं. मुंबईचा धावांचा खाली गेलेला ग्राफ या दोघांनी उंचावला आणि RRसमोर तगडे लक्ष्य उभे केले. पण, या सामन्यानंतर सोशल मीडियावर #Krunal असं ट्रेंड होत होतं. त्यामागे एक मजेशीर कारण आहे.
OMG : जोफ्रा आर्चरचा 152 kph च्या वेगानं बिमर; थोडक्यात बचावला हार्दिक पांड्या, पाहा Video
रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock) यांनी स्फोटक सुरुवात केली. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाज कार्तिक त्यागी ( Kartik Tyagi ) कडे कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ( Steve Smith) पाचवे षटक टाकण्यासाठी चेंडू दिला. रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे स्वागत केले. पण, त्याच षटकात कार्तिकनं MIला धक्का दिला. क्विंटन डी'कॉकला ( 23) अप्रतिम बाऊंसर टाकून त्यानं झेलबाद करून माघारी पाठवले. फ्रंटसिटवर बसलेल्या मुंबई इंडियन्सना श्रेयस गोपाळनं माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानं एकाच षटकात रोहित शर्मा (35) व इशान किशन ( 0) यांना सलग चेंडूंवर बाद केले.
मुंबई इंडियन्सचा IPL 2020त मोठा विक्रम; कोणत्याच संघाला जमला नाही हा पराक्रम!
हार्दिक पांड्या किंवा किरॉन पोलार्ड येणं अपेक्षित होतं, परंतु कृणाल पांड्याला आघाडीवर पाठवले. पण, कृणाल 12 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सूर्यकुमार आणि हार्दिकनं अखेरच्या पाच षटकांत 12च्या सरासरीनं धावा चोपून मुंबई इंडियन्सला मोठा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमारने 47 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या, हार्दिक 30 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 76 धावांची भागीदारी करून संघाला 4 बाद 193 धावांचा पल्ला गाठून दिला. हार्दिक-सूर्यकुमारच्या फटकेबाजीनंतरही सोशल मीडियावर कृणाल पांड्याची हवा होती. इशान बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या किंवा किरॉन पोलार्ड येणं अपेक्षित होतं, परंतु कृणाल पांड्याला आघाडीवर पाठवले. त्यानंतर त्याचा असा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पाहा फोटो...
प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( 0), कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 6) आणि संजू सॅमसन ( 0) हे 12 धावांत माघारी परतले. ट्रेंट बोल्टने दोन, तर जसप्रीत बुमराहनं 1 विकेट घेतली.